जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील पद्दार उपविभागात ढगफुटी झाली आहे. पद्दरच्या चाशोटी गावातील मचैल मंदिराजवळ ढगफुटी झाली आहे. या ठिकाणी लोक धार्मिक यात्रेसाठी जमले होते. ढगफुटीच्या घटनेनंतर पुरस्थिती निर्माण झाली आहे. ढगफुटीनंतर घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. यासोबतच काश्मीरच्या राजौरी आणि मेंढर येथूनही ढगफुटीची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुढील 5 ते 6 तास पुन्हा जोरदार पावसाचा इशार देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि दरड कोसळ्याची भीती व्यक्त केली जात आहे.
किश्तवाडमधील ढगफुटीमध्ये काही जणांचा दुर्देवी मुत्यू झाला असून काही लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. मचैल येथे चंडी मातेचे मंदिर असल्याने यात्रेसाठी लोक या घटनास्थळी जमले होते. भक्तांसाठी या ठिकाणी तंबू उभारण्यात आले होते आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यावेळी अचानक ढग फुटले. ढगफुटीच्या ठिकाणी जाणारा रस्ता वाहून गेला आहे. बचाव पथके घटनास्थळी पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा: सावरकर बदनामीप्रकरणात मोठी अपडेट, राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याची लेखी माहिती पुणे न्यायालयात सादर
जम्मूच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाल्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. हवामान केंद्र श्रीनगरने पुढील 5-6 तासांत जम्मू-काश्मीरच्या अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. बारामुल्ला, बांदीपोरा, श्रीनगर, काझीगुंड, गंदरबल, बडगाम, पूंछ, राजौरी, रियासी, दोडा आणि किश्तवार यासारख्या काही संवेदनशील ठिकाणी आणि डोंगराळ भागात ढगफुटी, अचानक पूर, भूस्खलन आणि चिखल कोसळण्याची शक्यता आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये 14 ऑगस्ट रोजी शुक्रवारी खोऱ्यातील चाशोटी भागात ढगफुटीची घटना घडली. माहितीनुसार, केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे आणि बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. "काश्मिरविरोधी पक्षाचे नेते आणि स्थानिक आमदार सुनील कुमार शर्मा यांच्याकडून तातडीने माहिती मिळाल्यानंतर किश्तवारचे डीसी पंकज कुमार शर्मा यांच्याशी आत्ताच बोललो. चाशोटी परिसरात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली, ज्यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. बचाव पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. नुकसानीचे मूल्यांकन, आवश्यक बचाव आणि वैद्यकीय व्यवस्थापन व्यवस्था केली जात आहे. माझे कार्यालय नियमित अपडेट्स घेत आहे, सर्व शक्य ती मदत पुरवली जाईल," असे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी एक्सवर पोस्टमध्ये म्हटले आहे.