Om Prakash Behera : मुलाच्या स्वप्नांसाठी आईचं बलिदान, 300/300 गुण मिळवत पटकावला JEE टॉपरचा मान!
जेईई मेन्सची परीक्षा भारतातील सर्वात कठिण परिक्षापैकी एक मानली जाते. या परिक्षेत एका तरूणानं भन्नाट कामगिरी केली आहे. त्या तरूणानं जेईई मध्ये ३०० पैकी ३०० गुण मिळवलं आहेत. ही किमया ओडिशाच्या ओम प्रकाश बेहेरा या तरूणानं केली आहे. ओमचे सर्वत्र कौतूक होत असून ओमच्या या यशात तिच्या आईचे देखील मोलाचं योगदान आहे.
भुवनेश्वरमध्ये जन्मलेल्या ओम प्रकाश बेहरा यांच्या कुटूंबातील बहुतांश सदस्य हे नागरी सेवेत आहेत. त्यामुळं ओमला लहापणापासून त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतूनच ओमने जेईई सारख्या कठीण परिक्षेत सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.
हेही वाचा - भारताला मिळणार नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; निवड प्रक्रिया लवकरच सुरू होणार
ओमसाठी आईनं सोडला जॉब –
ओमची फिजीक्स आणि मॅथ्स विषयामध्ये रूची होती. १० वी नंतर त्याने इंजिनिअरिंग करण्याचं ठरवलं. एका इंग्रजी न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये ओम म्हणाला की, तो सुरूवातीला सेल्फ स्टडी करत होता. तेव्हा त्याच्या ओळखीच्या व्यक्तींनी त्याला कोटा येथे जाऊन स्टडी करण्याचा सल्ला दिला. तो कोटा शहरात गेला. यादरम्यान तिच्या आईची भूमिका महत्वाची ठरली. तिच्या आईनं सरकारी प्राध्यापकाची नोकरी सोडत कोटा शहर गाठलं. त्यामुळं ओमला चांगला सपोर्ट मिळाला.
हेही वाचा - व्हॅलेंटाईन डे पूर्वी अपघात.. तलावात होता तरुणीचा मृतदेह, मित्र म्हणाला हे 'ऑनर किलिंग'
मोबाईलपासून चार हात दूर
ओमच्या यशाच रहस्य हे मोबाईलपासून दूर राहणं देखील आहे. ओमनं मोबाईलपासून चार हात दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. ज्याचा फायदा त्याला झाला. याशिवाय तो दररोज ८ ते ९ तास नियोजनबद्ध अभ्यास करायचा. यात तो प्रत्येक टेस्टनंतर, त्याच्या त्या टेस्टमध्ये झालेल्या चूका बघायचा आणि त्या चूका सुधारण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. त्याच्या यशात या सवयीचा मोठा हात आहे.
ओम प्रकाश आता जेईई एडव्हान्स्डसाठी उत्सुक आहे. आयआयटी मुंबईमधून कॉम्पूटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करण्याचं त्याचं स्वप्न आहे.