Sunday, August 31, 2025 04:21:47 PM

Indigo Flight Emergency Landing: मोठा अपघात टळला! इंजिन बिघाडामुळे इंडिगो विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

सुरतहून दुबईला निघालेल्या इंडिगो फ्लाइट 6ई-1507 च्या इंजिनमध्ये हवेत बिघाड झाला. विमानात सुमारे 150 प्रवासी होते. अचानक उद्भवलेल्या या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला.

indigo flight emergency landing मोठा अपघात टळला इंजिन बिघाडामुळे इंडिगो विमानाचे अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग

Indigo Flight Emergency Landing: मंगळवारी सकाळी इंडिगो विमानाचा मोठा अपघात टळला. सुरतहून दुबईला निघालेल्या इंडिगो फ्लाइट 6ई-1507 च्या इंजिनमध्ये हवेत बिघाड झाला. विमानात सुमारे 150 प्रवासी होते. अचानक उद्भवलेल्या या गंभीर तांत्रिक बिघाडामुळे सर्व प्रवाशांचा जीव धोक्यात आला. दरम्यान, पायलटने तातडीने आपत्कालीन प्रोटोकॉल लागू केला. तसेच विमानाला अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात यश मिळवले. यामुळे एक भीषण अपघात टळला. 

एअरलाइनच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, प्रवाशांची सुरक्षा ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि सर्व प्रक्रिया काटेकोरपणे पाळण्यात आल्या. तथापी, इंजिन बिघाडाची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही प्रवासी प्रार्थना करताना दिसले, तर काहींनी आप्तेष्टांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. व्यवसायानिमित्त दुबईला जाणारे प्रवासी राकेश पटेल यांनी सांगितले, आम्ही सर्वजण खूप घाबरलो होतो. क्रू सतत शांत राहण्याचे आवाहन करत होते, पण भीती स्पष्ट दिसत होती. अहमदाबादमध्ये विमान सुरक्षित उतरल्यावरच सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. 

हेही वाचा -  Defence Minister Rajnath Singh : भारतीय सैन्याला पाच वर्षे चालणाऱ्या युद्धासाठी सज्ज राहावं लागेल!

कोणतीही जीवितहानी नाही

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, इंजिनमध्ये बिघाड असूनही विमानाचे अत्यंत सुरळीत लँडींग करण्यात आले. विमानतळ अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, यादरम्यान, कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाली नाही. इंडिगोने अधिकृत निवेदनात म्हटले, या घटनेमुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे, पण परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित आणि व्यावसायिक पद्धतीने हाताळल्याचा आम्हाला आनंद आहे.

हेही वाचा -  PM Modi to Meet Xi Jinping: भारताची रणनीती! पंतप्रधान मोदी 31ऑगस्टला घेणार शी जिनपिंग यांची भेट

पर्यायी विमानाची व्यवस्था

आपत्कालीन लँडिंगनंतर इंडिगोच्या अभियांत्रिकी पथकाने इंजिन बिघाडाचे कारण शोधण्यासाठी तपासणी सुरू केली. तसेच प्रवाशांना दुबईपर्यंत पोहोचवण्यासाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली. दुपारी उशिरापर्यंत सर्व प्रवाशांना दुसऱ्या विमानात हलवण्यात आले आणि त्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. 


सम्बन्धित सामग्री