शनिवारी, 22 मार्च 2025 रोजी कोलकातामधील ईडन गार्डन्स येथे आयपीएल 2025 उद्घाटन समारंभात 18 व्या इंडियन प्रीमियर लीग हंगामाची अधिकृत सुरुवात होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) यांचा सामना आयपीएल 2025 च्या उद्घाटन समारंभाच्या पूर्वीच नियोजन केले असून, इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) उद्घाटन समारंभ भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:00 वाजता सुरू होणार आहे. आयपीएल 2025 उद्घाटन समारंभ तुम्ही लाईव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) आणि थेट प्रक्षेपणवर (Live Telecast) पाहण्यासाठी उपलब्ध असेल.
केकेआर विरुद्ध आरसीबीच्या उद्घाटन सामन्यात विराट कोहली, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांच्यासारखे काही जागतिक क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत, तर आयपीएल 2025 च्या उद्घाटन सोहळ्यामध्ये आपल्याला नवनवीन कलाकार पाहायला मिळतील.
कोणते कलाकार करणार आयपीएल 2025 उद्घाटन समारंभात सादरीकरण?
आयपीएल 2025 च्या उद्घाटन समारंभासाठी, बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी, पंजाबी रॅपर करण औजला आणि लोकप्रिय पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांची निवड आधीच झाली आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही सुचवण्यात आले की, बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेता वरुण धवन आणि गायक अरिजित सिंग यांना कलाकारांच्या यादीत समाविष्ट केले जाऊ शकते. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, दिशा पटानी आणि करण औजलासोबत लोकप्रिय अमेरिकन पॉप बँड वनरिपब्लिकलाही (Popular American pop band OneRepublic) एका परफॉर्मन्ससाठी संपर्क साधण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्ष जय शाह यांच्यासोबत आयपीएल 2025 च्या उद्घाटन समारंभाला सलमान खान, विकी कौशल आणि संजय दत्तसारखे अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यासोबतच, केकेआर संघाचा मालक शाहरुख खान देखील या उद्घाटन समारंभात उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. आयपीएल ही जगातील सर्वात फायदेशीर टी-20 क्रिकेट लीग आहे. 74 सामन्यांमध्ये 10 संघ सहभागी होणारी ही स्पर्धा 25 मे रोजी अंतिम फेरीने संपेल.
'या' ठिकाणी तुम्ही पाहू शकता आयपीएल 2025 उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण:
आयपीएल 2025 उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि नेटवर्क 18 टीव्ही चॅनेलवर केले जाईल.