New Delhi Railway Station Stampede Reason
Edited Image
New Delhi Railway Station Stampede Reason: गेल्या आठवड्यात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीची घटना (New Delhi Railway Station Stampede Case) घडली होती. या दुर्दैवी घटनेत 18 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. आता नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील अपघाताबाबत रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीच्या घटनेपूर्वी नेमकं काय घडले याचे तपशीलवार वर्णन करण्यात आले आहे.
'त्या' दिवशी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं?
अहवालानुसार, शिवगंगा एक्सप्रेस रात्री 8 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वरून निघाल्यानंतर, प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची मोठी गर्दी जमू लागली. 12, 13, 14, 15,16 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मकडे जाणारे मार्ग पूर्णपणे जाम झाले होते. आरपीएफ निरीक्षकांनी स्टेशन डायरेक्टरना विशेष ट्रेन लवकर चालवण्याचा सल्ला दिला. गर्दीमुळे, आरपीएफ निरीक्षकांनी प्रयागराजसाठी प्रति तास 1500 तिकिटे विकणाऱ्या रेल्वे पथकाला तिकिटे विक्री तात्काळ थांबवण्यास सांगितले.
हेही वाचा - नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; वाचा सविस्तर
कुंभ स्पेशल ट्रेनच्या दोन वेळा घोषणेने प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ -
दरम्यान, रात्री 8:45 वाजता प्रयागराजला जाणारी कुंभ स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 12 वरून सुटेल, अशी घोषणा करण्यात आली. तथापि, काही वेळाने, स्टेशनवर पुन्हा एकदा कुंभ स्पेशल ट्रेन प्लॅटफॉर्म क्रमांक 16 वरून सुटेल अशी घोषणा करण्यात आली. त्यानंतर प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली.
हेही वाचा - Mahakumbh 2025: महाकुंभानंतर नागा, अघोरी साधू परतू लागलेत, आता ते कुठे जाणार? जाणून घ्या..
कुंभ स्पेशल ट्रेनती घोषणा ऐकताच, प्रयागराज स्पेशलचे प्रवासी प्लॅटफॉर्म 12-13 आणि 14-15 वरून फूट ओव्हर ब्रिज 2 आणि 3 वर जाण्यासाठी पायऱ्या चढण्यासाठी धावले. दरम्यान, दुसऱ्या ट्रेनचे प्रवासी पायऱ्यांवरून खाली येत असताना धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी झाली. हा अपघात रात्री 8:48 वाजता झाला.