Thursday, September 18, 2025 10:02:04 PM

iPhone 17 Cyber Fraud : सावधान! 'iPhone 17' च्या नावावर ऑनलाइन फसवणूक; भामटे असे रिकामे करतात तुमचे बँक अकाउंट

ॲपल आयफोन 17 सिरीजची प्रि-बुकींग सुरू असल्याचे सांगून ग्राहकांना अनेक बनावट ऑफर्सचे आमिष दिले जाते. 'या' ऑफर्सना बळी पडू नका; असा कास्पर्सकीकडून ग्राहकांना मोठा अलर्ट देण्यात आला आहे.

iphone 17 cyber fraud  सावधान iphone 17 च्या नावावर ऑनलाइन फसवणूक भामटे असे रिकामे करतात तुमचे बँक अकाउंट

iPhone 17 Cyber Fraud : ॲपल आयफोन 17 सिरीजची (Apple iPhone 17 Series) प्री-बुकिंग सुरू झाल्यामुळे सायबर भामट्यांनीही लोकांची फसवणूक करण्यासाठी आपली नवी खेळी सुरू केली आहे. सायबर सिक्युरिटी फर्म कास्पर्सकीने (Kaspersky) याबाबत मोठा इशारा दिला आहे. फसवणूक करणारे लोक नकली वेबसाइट, बनावट लॉटरी आणि आकर्षक ऑफर्सच्या नावाखाली ग्राहकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरत आहेत.

अशी केली जाते फसवणूक
बनावट वेबसाइट्स : सायबर भामटे ॲपलच्या अधिकृत वेबसाइटसारख्या दिसणाऱ्या बनावट वेबसाइट्स (Fake Websites) तयार करतात. या साइट्सवर 'आयफोन 17'ची लवकर प्री-ऑर्डर (Pre-order iphone 17) करण्याचे आश्वासन दिले जाते. जेव्हा ग्राहक फोन खरेदी करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्याकडे बँक कार्डची माहिती मागितली जाते, जी भामटे चोरतात.

फ्री आयफोनचे आमिष : स्कॅमर्स लोकांना बनावट लॉटरी (Fake Lottery) किंवा 'फ्री आयफोन' जिंकल्याचे (Free Iphone win) आमिष दाखवतात. यासाठी ग्राहकांना सर्व्हे पूर्ण करण्यास सांगितले जाते आणि ईमेल आयडी, फोन नंबर तसेच शिपिंग शुल्क भरण्यास सांगितले जाते. या बनावट साइट्सवर नकली विजेत्यांची यादीही दाखवली जाते, जेणेकरून ग्राहक त्यावर विश्वास ठेवतील.

हेही वाचा - ATM Malfunction in Mewat: मेवातमधील ATM मध्ये गोंधळ! शून्य बॅलन्स असूनही तरुणांनी काढले पैसे; काय आहे नेमकं प्रकरण?

ऑनलाइन फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे कराल?
अधिकृत साइटवरून खरेदी करा: नेहमी ॲपलच्या अधिकृत साइटवरूनच खरेदी करा. खरेदी करण्यापूर्वी वेबसाइटचा युआरएल (URL) काळजीपूर्वक तपासा. स्पेलिंगच्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका.
अधिकृत विक्रेत्याकडूनच घ्या : फोन नेहमी अधिकृत वितरक (Authorized Dealer) किंवा रिटेलरकडूनच खरेदी करा.
अनपेक्षित लिंक्सवर क्लिक करू नका : ईमेल, मेसेज किंवा सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही आकर्षक ऑफर्सना बळी पडू नका. विचार न करता कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्याची चूक करू नका. अशा लिंक्सवर क्लिक केल्यास तुमचे बँक अकाउंट रिकामे होऊ शकते.

हेही वाचा - Meta Smart Glasses: मार्क झुकरबर्गने लाँच केला AI स्मार्ट चष्मा; आता फोनशिवाय पाहता येतील मेसेज आणि कॉल


सम्बन्धित सामग्री