Sunday, August 31, 2025 04:37:57 PM

फक्त 250 रुपयांना खरेदी केलेल्या पेंटिंगचा लिलाव ठरला 'इतक्या' लाखांना; किंमत ऐकून व्हाल अवाक! काय आहे प्रकरण? जाणून घ्या

एका महिलेने फक्त 250 रुपयांना एक पेंटिंग खरेदी केले. मात्र, नंतर या महिलेला कळले की, ते पेंटिंग एका खूप मोठ्या कलाकाराने बनवले आहे. तसेच या पेंटिंगची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे.

फक्त 250 रुपयांना खरेदी केलेल्या पेंटिंगचा लिलाव ठरला इतक्या लाखांना किंमत ऐकून व्हाल अवाक काय आहे प्रकरण जाणून घ्या
Johan Berthelson Painting
Edited Image, Instagram

Painting Viral News: आपण सोशल मीडियावर अनेकदा काही आश्चर्यजनक गोष्टी वाचतो. यातील काही गोष्टींवर आपला विश्वास देखील बसत नाही. सध्या अशीचं एक बातमी आहे, जी ऐकल्यानंतर तुमचाही यावर विश्वास बसणार नाही. एखादी व्यक्ती खूप कमी किमतीत एखादी वस्तू खरेदी करते पण नंतर त्या व्यक्तीला कळते की ही वस्तू खूप मौल्यवान आहे आणि त्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे. हे प्रकरण अमेरिकेतील आहे, जिथे एका महिलेने फक्त 250 रुपयांना एक पेंटिंग खरेदी केले. मात्र, नंतर या महिलेला कळले की, ते पेंटिंग एका खूप मोठ्या कलाकाराने बनवले आहे. तसेच या पेंटिंगची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. नेमकं हे प्रकरण काय ते जाणून घेऊयात...

250 रुपयांना खरेदी केले पेंटिंग - 

प्राप्त माहितीनुसार, 27 वर्षीय अमेरिकन महिला मारिसा अल्क्रोनने सोशल मीडियावर पोस्ट करून तिची कहाणी शेअर केली. मारिसाने सांगितले की, ती तिच्या मंगेतर आरोन हेलीसोबत ओहायोतील ओकवुड येथील तिच्या गावी कुठेतरी घरी परतत होती. दरम्यान, त्याने ठरवले की, त्याला एका दुकानाला भेट द्यायची आहे. दुकानाच्या मालकाने त्याला दुकानात नुकत्याच आलेल्या काही वस्तू दाखवल्या. यानंतर, मारिसाला काही चित्रे आवडली आणि तिने ती चित्रे खरेदी केली.

हेही वाचा - Viral Video: कोरियन वडिलांनी बाळासाठी गायली अंगाई

दरम्यान, मारिसाने फक्त 2.9 डॉलर्स म्हणजेच सुमारे 253 रुपयांना एक पेंटिंग खरेदी केली. यानंतर, जेव्हा ती गाडीने घरी जात होती, तेव्हा तिचे लक्ष पेंटिंगच्या एका कोपऱ्याकडे गेले, जिथे पेंटिंग बनवणाऱ्या कलाकाराचे नाव लिहिलेले होते. हे नाव होते जोहान बर्थेलसन. सुरुवातीला मारिसाला वाटले की, तो स्थानिक चित्रकार असावा. नंतर मारिसाने गुगलवर हे नाव शेअर केले. त्यानंतर तिला समजले की, जोहान बर्थेलसन एक उत्तम कलाकार आहे. त्यांच्या एका चित्रांची किंमत 1.50 लाख ते 31 लाख रुपयांपर्यंत आहे.

हेही वाचा - गेल्या 20 दिवसांत राम मंदिराला मिळाली 'इतकी' देणगी! मोजणही झालं कठीण

त्यानंतर मारिसाने सिनसिनाटी येथील काजा सायक्स आर्ट गॅलरीशी संपर्क साधला, ज्यांनी पेंटिंगची किंमत अंदाजे 1.50 लाख ते 2.50 लाख रुपये सांगितली. मारिसाने आता या पेंटिंगचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला असून यातून तिला सुमारे 2 लाख रुपये मिळणार आहेत. मारिसा हे पैसे तिच्या लग्नावर खर्च करणार आहे.
 


सम्बन्धित सामग्री