Wednesday, August 20, 2025 08:17:24 AM

अदानी समूहाच्या कंपन्या भरत आहेत 'मोदी सरकार'ची तिजोरी! गेल्या वर्षी भरला 58,104 कोटी रुपयांचा टॅक्स

अदानी समूहाने सांगितले की, भरलेल्या करांमध्ये जागतिक कर, दर, अदानी पोर्टफोलिओ कंपन्यांनी भरलेले इतर कर, अप्रत्यक्ष कर इत्यादींचा समावेश आहे.

अदानी समूहाच्या कंपन्या भरत आहेत मोदी सरकारची तिजोरी गेल्या वर्षी भरला 58104 कोटी रुपयांचा टॅक्स
Adani Group Tax contributions for FY24
Edited Image

Adani Group Tax contributions for FY24: अदानी समूह हा भारतातील मोठ्या उद्योग समूहापैकी एक आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाने 2023-24 (एप्रिल, 2023 ते मार्च, 2024) या आर्थिक वर्षासाठीचा कर पारदर्शकता अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, अदानी समूहाच्या कंपन्यांनी 2023-24 या आर्थिक वर्षात 58,104 कोटी रुपयांचा कर भरला आहे. या समूहाने रविवारी यासंदर्भात माहिती दिली. अदानी समूहाने 2022-23 या आर्थिक वर्षात 46,610 कोटी रुपयांचा कर भरला. अदानी समूहाने सांगितले की, भरलेल्या करांमध्ये जागतिक कर, दर, अदानी पोर्टफोलिओ कंपन्यांनी भरलेले इतर कर, अप्रत्यक्ष कर इत्यादींचा समावेश आहे. 

हेही वाचा - माल्ल्या ते मेहता जाणून घ्या भारतातील मोठी आर्थिक फसवणूक

अदानी समूहातील 'या' कंपन्यानी भरला मोठा कर - 

दरम्यान, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये अदानी समूहाचे एकूण जागतिक कर आणि इतर योगदान 58,104.4 कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सूचीबद्ध कंपन्यांच्या पोर्टफोलिओद्वारे 46,610.2 कोटी रुपयांच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवते, असे समूहाने एका निवेदनात म्हटले आहे. समूहाच्या सात सूचीबद्ध कंपन्यांनी प्रकाशित केलेल्या स्वतंत्र अहवालांमध्ये यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. 

हेही वाचा - भारतातील १ रुपया 'या' देशात आहेत तब्बल २९६ रुपये. जाणून घ्या

यामध्ये अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पॉवर, अदानी टोटल गॅस आणि अंबुजा सिमेंट्स या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. या सात कंपन्यांपैकी तीन इतर सूचीबद्ध कंपन्या एनडीटीव्ही, एसीसी आणि सांघी इंडस्ट्रीज, यांचा देखील हा कर भरण्यात समावेश आहे. 

अदानी समूहाचे भारताच्या तिजोरीत महत्त्वपूर्ण योगदान - 

दरम्यान, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी सांगितले की, 'आम्ही स्वतःला भारताच्या तिजोरीत सर्वात मोठे योगदान देणारे मानतो, त्यामुळे आमची जबाबदारी अनुपालनापलीकडे जाते. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेतील प्रत्येक रुपया पारदर्शकता आणि सुशासनासाठी आपली वचनबद्धता दर्शवितो. हे अहवाल स्वेच्छेने जनतेसोबत शेअर करून, आम्ही भागधारकांचा विश्वास वाढवणे आणि जबाबदार कॉर्पोरेट वर्तनासाठी नवीन मानके निश्चित करण्याचे उद्दिष्ट ठेवतो.'


सम्बन्धित सामग्री