Sunday, August 31, 2025 04:15:28 PM

नाराज भुजबळ घेताय भाजपा नेत्यांची भेट.. कारण काय?

मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक जण नाराज असल्याचे समोर आले. त्यातच आता राष्ट्रवादीचे छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याच पाहायला मिळतंय.

 नाराज भुजबळ घेताय भाजपा नेत्यांची भेट कारण काय

मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक जण नाराज असल्याचे समोर आले. त्यातच आता राष्ट्रवादीचे छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेल्याच पाहायला मिळतंय. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेय. मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज होते आणि आता त्यानंतर त्यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता छगन भुजबळ अमित शहांची भेट घेणार असल्याचं देखील समोर आलं आहे. या भेटीमागे भुजबळ भाजपात तर जाणार नाही ना? असा प्रश्न सर्वानाच पडलाय. 

काय म्हणाले छगन भुजबळ? 

राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ हे दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. राजकीय तर्क-विर्तक, चर्चांना उधाण आले होते. चर्चांचा धुरळा उडाल्यानंतर छगन भुजबळ यांची दिल्लीत कोणतीही पूर्वनियोजित भेट ठरलेली नाही, अशी माहिती भुजबळांच्या कार्यालयातून देण्यात आली. 

त्याचबरोबर ओबीसी समाजाच्या हक्कावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक झाली असल्याचं देखील समोर आलं आहे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे आणि राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित न राहिल्यामुळे नाराज असलेले छगन भुजबळ हे भाजपच्या मोठ्या नेत्यांची भेट घेणार असून भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत ओबीसी समाजाच्या हिताबाबत चर्चा केली. त्याचबरोबर यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजाचे नुकसान होऊ देणार नाही, असे ठाम आश्वासन दिले. “ओबीसी नाराज आहेत, हे मला कळतंय,” असं ही ते म्हणाले आहेत.


सम्बन्धित सामग्री