Wednesday, August 20, 2025 09:19:28 AM

Budh Uday 2025: रक्षाबंधनला बुधाचा उदय या राशींसाठी अत्यंत भाग्याचा; मिळणार प्रचंड यश

वैदिक ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. हा ग्रहांचा राजकुमार मानला जातो. याच्यामुळे मानवी जीवनावर मोठा प्रभाव पडतो. याची कृपा आणि आशीर्वाद यशदायी आणि फलदायी मानला जातो.

budh uday 2025 रक्षाबंधनला बुधाचा उदय या राशींसाठी अत्यंत भाग्याचा मिळणार प्रचंड यश

Raksha Bandhan Lucky Zodiac: यंदाचं रक्षाबंधन खास असणार आहे. कारण, बुध ग्रह कर्क राशीत उदय होणार आहे. त्याचा 9 ऑगस्ट 2025 रोजी उदय होईल त्यानंतर तो 11 ऑगस्ट रोजी त्याच राशीत सरळमार्गी होईल. यापूर्वी 24 जुलै 2025 रोजी बुध कर्क राशीत अस्त झाला होता. बुधाचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कारण, त्याचा लोकांच्या जीवनावर पडणारा प्रभाव महत्त्वपूर्ण असतो. बुध हा व्यवसायाचा कारक मानला जातो आणि ज्या लोकांवर बुध ग्रहाची कृपा असते, त्यांना व्यवसाय क्षेत्रात प्रचंड यशस्वी होतात. त्यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रात, बुध ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी बुध ग्रहाच्या उदयाने 6 राशींना नशिबाची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल.

मेष राशीच्या लोकांवर बुध ग्रहाच्या उदयाचा प्रभाव

बुध ग्रह मेष राशीच्या जातकांच्या तिसऱ्या आणि सहाव्या घराचा स्वामी आहे आणि कर्क राशीत बुधाचा उदय मेष राशीच्या चौथ्या घरात होणार आहे. त्याच्या उदयामुळे मेष राशीची शक्ती लक्षणीयरीत्या वाढते आणि राशीसाठी ते शुभ ठरेल. तुम्हाला आतापर्यंत तुमच्या कामात समस्या येत होत्या, तर आता त्या संपतील. लोक मालमत्तेशी संबंधित समस्या सोडवू शकतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि आनंद राहील.

हेही वाचा - Raksha Bandhan 2025: कोणती राखी घेऊ? संभ्रमात आहात? भावाच्या राशीनुसार लकी रंगाची राखी बांधा.. त्याचं भाग्य उजळेल!

बुध ग्रहाचा मिथुन राशीवर प्रभाव

बुध ग्रह मिथुन राशीच्या चौथ्या घराचा स्वामी आहे आणि तो मिथुन लग्न रास असलेल्यांचा किंवा मिथुन जन्म रास असलेल्यांचा स्वामी ग्रह आहे. बुध मिथुन राशीच्या दुसऱ्या घरात उदयास येईल या काळात त्यांना अनुकूल परिणाम मिळण्याची शक्यता आहे. कर्क राशीत बुध राशीच्या उदयामुळे मिथुनेच्या जातकांचे आरोग्य सुधारू शकते. पैसे कमविण्यासाठी आणि मालमत्ता वाढवण्यासाठी देखील हा अनुकूल काळ आहे. या काळात ते दागिने आणि नवीन कपडे खरेदी करू शकतात. कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम, आपुलकी आणि परस्पर सहकार्य, समजूतदारपणा वाढेल. बुध राशीच्या उदयामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊ शकतो आणि प्रगतीची संधी मिळू शकते.

बुध ग्रहाचा कन्या राशीवर प्रभाव

बुध ग्रह कन्या राशीसाठी लग्न आणि कर्म घराचा स्वामी आहे. या काळात तुमच्या आरोग्यात बदल होतील. व्यावसायिक जीवनात प्रगती आणि पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात. तुमच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. या स्थितीत अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. अडकलेले पैसे आता तुम्हाला परत मिळू शकतात. कामातील सर्व अडचणी आता दूर होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी, राशीच्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. वैवाहिक जीवनात शांती आणि आनंद राहील.

हेही वाचा - Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनावेळी अशी चूक करू नका; नाहीतर, बहीण-भावाच्या नात्यात पडू शकते दरी

बुध ग्रहाचा कुंभ राशीवर प्रभाव

बुध ग्रह हा कुंभ राशीच्या पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे. सहाव्या घरात बुधाचे भ्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरेल. त्यांना वैयक्तिक आणि कामाच्या जीवनात सकारात्मक परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कोणत्याही आरोग्य समस्येशी झुंजत असाल तर आता तुम्ही त्यातून मुक्त होऊ शकता. या काळात आर्थिक लाभाच्याची चांगल्या संधी समोर येतील. या राशीचे लोक त्यांच्या शत्रूंवर मात करू शकतात, समाजात त्यांची प्रतिष्ठा वाढेल. कला आणि साहित्याशी संबंधित लोकांना अनुकूल परिणाम मिळू शकतात.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री