Wednesday, August 20, 2025 09:21:45 AM

Snake VIDEO : अरे देवा! घरातून 10 फूट लांबीचा नाग बाहेर आला; माणसासारखा उभा राहिला! बघा थरारक व्हिडिओ

Cobra Video Viral : घरातून तब्बल 10 फूट लांबीचा नाग बाहेर आला. सर्पमित्र त्याला पकडायचा प्रयत्न करत होता. त्याला पाहून साप माणसासारखा उभा राहिला. त्यानंतर जे घडले..

snake video  अरे देवा घरातून 10 फूट लांबीचा नाग बाहेर आला माणसासारखा उभा राहिला बघा थरारक व्हिडिओ

Snake Viral Video : दररोज सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत राहतात. साप पाहून अनेकांना खूप भीती वाटते. अंग थरथर कापू लागते. काही साप खूप विषारी असतात; तर, काही बिनविषारी असतात. सर्वसामान्य माणूस साप विषारी असो की बिनविषारी त्याच्यापासून दूरच राहतो. परंतु, साप कधीकधी घरांच्या आसपास येतात. अनेक वेळा ते कार, बाईक, घरे आणि शूजमध्ये देखील दडून बसलेले असतात.

उन्हाळ्या-पावसाळ्याच्या दिवसात लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः जंगलांच्या आसपासच्या भागात आणि गावांमध्ये. तर, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर कोणाचाही थरकाप होऊ शकतो. काळ्या सापाचा हा व्हिडिओ पाहून कोणालाही भीती वाटू शकते.

हेही वाचा - हा आहे जगातील सर्वात महागडा कीटक... तब्बल 75 लाखांचा! जाणून घ्या, लोक याच्यासाठी का वेडे आहेत..

एका व्यक्तीच्या घरातून एक-दोन नाही, तब्बल 10 फूट लांबीचा नाग बाहेर आला. तो सर्पमित्रासमोर मोठा फणा काढून उभा असलेला दिसतो. ती व्यक्ती सापाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो साप वारंवार फणा काढून त्याच्यावर हल्ला करत आहे.

त्या व्यक्तीच्या हातात फक्त दोन फूट लांबीचा पाईप आहे आणि तो सापाला त्यात घालण्याचा प्रयत्न करत आहे. या पाईपला एक पोते जोडलेले आहे. सोशल मीडियावर सर्वजण त्या व्यक्तीच्या शौर्याचे आणि कौशल्याचे कौतुक करत आहेत. ती व्यक्ती अजिबात घाबरत नाही आणि सापाला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करते. तो तरुण वारंवार सापाला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी, ती व्यक्ती शिताफीने दोन फूट लांबीच्या पाईपद्वारे लांब सापाला पोत्यात पकडते. यानंतर सापाला त्यातून बाहेर पडू देत नाही. या व्हायरल व्हिडिओवर लोकांनी खूप कमेंट केल्या आहेत.

हेही वाचा - VIDEO : वनअधिकाऱ्याने X वर शेअर केला हत्तींच्या पिल्लांचा सुंदर व्हिडिओ; लोकांकडून कौतुकाचा वर्षाव


सम्बन्धित सामग्री