मुंबई : बीड हत्येप्रकरणी राजकीय वातावरण तापले असल्याचे पाहायला मिळत आहे. बीडमधील आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव घेताना एका कार्यक्रमाचा उल्लेख करत प्राजक्ता माळीसह काही अभिनेत्रींची नाव घेतली. यामुळे अभिनेत्री, लेखिका आणि निर्माती प्राजक्ता माळी हीने मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केले आहे. माझ्या भावाने माझा सोशल मीडिया बंद केला. माझी आई रात्रभर झोपली नाही. यामुळे माझ्या कुटुंबाला त्रास होत असल्याचे माळीने सांगितले आहे. त्याचबरोबर या प्रकरणात काहीही संबंध नसताना आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री माळीचे नाव घेतल्याने धस यांनी माफी मागावी असे अभिनेत्री प्राजक्ता माळीने म्हटले आहे. यावेळी प्राजक्ता माळीला कंठ दाटून आल्याचेही पाहायला मिळाले.
हेही वाचा : Beed Murder Case: बीडमधील मोर्चातून जरांगेंचा सरकारवर निशाणा
'धस यांनी माझी माफी मागावी'
बीडमधील प्रकरणात कलाकारांना का खेचत आहात. फक्त महिला कलाकारांचं नाव का येतं. एका फोटोसाठी कोणासोबतही नाव जोडणार का? असे प्रश्न प्राजक्ताने यावेळी केले आहेत. आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यांचा निषेध करते. धस यांच्या आरोपांना आधार नाही. धस यांनी सांगितलेली गोष्ट खोटी असल्याचे सांगत आमदार धस यांनी माफी मागावी असे प्राजक्ता माळीने म्हटले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
'मुख्यमंत्र्यांनी कठोऱ पावलं उचलावी'
बीड प्रकरणात बोलताना धस यांनी प्राजक्ताचे नाव घेतल्याने तिने पत्रकार परिषद घेतली. महिला आयोगात तक्रार केली असल्याचेही यावेळी तिने सांगितले. मुख्यमंत्र्यांनी याविषयी कठोऱ पावलं उचलावी अशी विनंती प्राजक्ताने सरकारला केली आहे.