Wednesday, August 20, 2025 04:29:46 AM

एलोन मस्क पुन्हा लाँच करणार व्हाइन अ‍ॅप; काय असेल खास? जाणून घ्या

मस्क यांनी घोषणा केली आहे की ते ‘व्हाइन’ अॅप पुन्हा लाँच करणार आहेत. परंतु, यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून हे अॅप नव्या रुपात सादर होणार आहे.

एलोन मस्क पुन्हा लाँच करणार व्हाइन अ‍ॅप काय असेल खास जाणून घ्या
Elon Musk
Edited Image

Elon Musk To Relaunch Vine App: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी उद्योजक एलोन मस्क पुन्हा एकदा एक ऐतिहासिक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. मस्क यांनी घोषणा केली आहे की ते ‘व्हाइन’ अॅप पुन्हा लाँच करणार आहेत. परंतु, यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून हे अॅप नव्या रुपात सादर होणार आहे. मस्क यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून ही माहिती अधिकृतपणे शेअर केली आहे.

व्हाइन अॅप काय आहे?

व्हाइन हे एक शॉर्ट-व्हिडिओ शेअरिंग अॅप होते, जे 2013 मध्ये लाँच करण्यात आले होते. 6 सेकंदांच्या छोट्या व्हिडिओंसाठी प्रसिद्ध असलेल्या या अॅपने त्या काळात तरुणांमध्ये जबरदस्त लोकप्रियता मिळवली होती. अनेक प्रसिद्ध यूट्यूबर्स आणि क्रिएटर्सने याच प्लॅटफॉर्मवरून आपली कारकीर्द सुरू केली होती. परंतु 2016 मध्ये वाढती स्पर्धा आणि आर्थिक अडचणीमुळे हे अॅप बंद करण्यात आले होते.

हेही वाचा - OMG! एलोन मस्कच्या शाळेत एका तासाची फी 1.88 लाख रुपये

दरम्यान, आता एलोन मस्क यांच्या नव्या घोषणेनुसार, व्हाइन अॅप आता AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने पुन्हा लाँच होणार आहे. यामुळे वापरकर्ते कमी वेळात, अधिक क्रिएटिव्ह आणि इंटरअॅक्टिव्ह व्हिडिओ सहज तयार करू शकणार आहेत. मस्क यांनी म्हटलं आहे की, 'आम्ही वाईन अॅप परत लाँच करणार आहोत, पण यावेळी ते एआय स्वरूपात असेल.'

हेही वाचा - एलोन मस्कच्या SpaceX Starship रॉकेटचा चाचणीदरम्यान स्फोट

व्हाइन अॅप सोशल मीडियासाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता - 

AI टेक्नोलॉजीच्या समावेशामुळे हे नवीन वाईन अॅप स्नॅपचॅट, टिकटॉक आणि इन्स्टाग्राम रील्ससारख्या अॅप्सना टक्कर देऊ शकते. एलोन मस्क यांचा X प्लॅटफॉर्मही आता विविध मल्टीमीडिया फॉर्मेट्सच्या दिशेने पुढे जात आहे. त्यामुळे व्हाइन AI हा त्यातला महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. एलोन मस्क यांचे हे अॅप नेमके कधी लाँच होणार, त्यात कोणते AI फीचर्स असणार आणि हे युजर्ससाठी कितपत उपयुक्त ठरणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
 


सम्बन्धित सामग्री