Wednesday, August 20, 2025 09:25:14 AM

घड्याळ भेट देण्याचा विचार करताय? थांबा, आधी जाणून घ्या, याचा जीवनावर काय परिणाम होतो..

काळ सतत पुढे जात असतो आणि घड्याळाच्या सहाय्याने आपण तो मोजत असतो. तेव्हा, एखाद्याला घड्याळ भेट म्हणून देणे योग्य आहे की नाही, जाणून घेऊ..

घड्याळ भेट देण्याचा विचार करताय थांबा आधी जाणून घ्या याचा जीवनावर काय परिणाम होतो

Thinking of giving a watch as a gift? : घड्याळ हे केवळ वेळ दाखवणारे यंत्र नाही. ते काळाचे मापन करणारे साधन आहे. मानवाच्या जीवनात काळा किंवा वेळ यांचे महत्त्व खूप आहे. काळ सतत पुढे जात असतो आणि घड्याळाच्या सहाय्याने आपण तो मोजत असतो. त्यामुळे घड्याळ वेळेच्या प्रवाहाचे संकेत देते. याच कारणामुळे त्याला जीवनाची गती किंवा दशा याच्याशी जोडून पाहिले जाते. अनेक परंपरांमध्ये असे मानले जाते की, घड्याळ एखाद्याला भेट म्हणून दिल्याने तुमच्या जीवनाची गती किंवा वेळेची दिशा त्या व्यक्तीशी जोडली जाते. तर, तुम्हीही कोणाला भेटवस्तू म्हणून घड्याळ देण्याचा विचार करत असाल, तर जरा थांबा. कारण, या वेळेशी आणि त्यामुळेच घड्याळाशी तुमच्या जीवनातील अनेक गोष्टी जोडलेल्या असतात.

आपण अनेकदा खास प्रसंगी आपल्या ओळखीच्या किंवा नातेसंबंधातील व्यक्तींना भेटवस्तू देतो. कधी कपडे, कधी मिठाई, तर कधी काहीतरी असे जे दीर्घकाळ आठवणीत राहील, जसे की घड्याळ. घड्याळ ही एक अशी भेटवस्तू आहे जी वेळेचे प्रतीक आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की वास्तुशास्त्रानुसार आणि ज्योतिषानुसार कोणतीही वस्तू कोणीही भेट देणे योग्य नाही. भेटवस्तू देताना संबंधित व्यक्तीशी आपले नातेसंबंध काय आहेत, हे विचारात घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, आपल्या जीवनातील परिस्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा - Shravan 2025: शिवामूठ म्हणजे काय? जाणून घ्या, श्रावणात भगवान शिवाच्या या पूजनाचं महत्त्व काय..

काही गोष्टी आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम करतात तर काही गोष्टी वेळेलाच उलटे फिरवतात, अशी मान्यता आहे. घड्याळही याच गोष्टींमध्ये येते. तर, जाणून घेऊ, घड्याळ भेट म्हणून देणे योग्य आहे की नाही? ते कोणत्या लोकांना देणे ठीक आहे आणि कधी ते टाळले पाहिजे?

भेटवस्तू म्हणून घड्याळ देणे आणि वेळ यांचे कनेक्शन
घड्याळाची भेट कोणाचीही ‘वेळ’ बदलू शकते, शास्त्रात म्हटले आहे. जर, तुम्ही अशा व्यक्तीला घड्याळ दिले ज्याची वेळ चांगली चालत नाही, तर त्याचा परिणाम तुमच्या वेळेवरही होऊ शकतो. म्हणजेच तुमच्या जीवनातही अडचणी येऊ शकतात. दुसरीकडे, जर तुम्ही अशा व्यक्तीला घड्याळ भेट दिले ज्याची वेळ चांगली चालत आहे, तर त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून घड्याळ भेट देताना विचारपूर्वक द्यावे. कारण, शास्त्रानुसार, ही वस्तू अत्यंत संवेदनशील मानली जाते.

या परिस्थितीत घड्याळ भेट देणे योग्य नाही
1) जेव्हा तुमचं सर्व काही चांगलं चाललेलं असेल : त्यावेळी कोणालाही घड्याळ देणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. तुमची प्रगती थांबू शकते किंवा काही अडथळा येऊ शकतो.
2) ज्याला भेट द्यायची त्याची वेळ ठीक नसेल : जर समोरची व्यक्ती आधीपासूनच अडचणींशी झुंजत असेल, तर घड्याळ दिल्याने तुम्हीही त्याच्या समस्यांचा भाग बनण्याची शक्यता असते.
3) वारंवार थांबणारे घड्याळ : असे घड्याळ जे वारंवार बंद होते किंवा चुकीचा वेळ दाखवते, ते वास्तुशास्त्रानुसार नकारात्मकता पसरवते.

हेही वाचा - मोती धारण करण्याचा या राशींना करिअर-व्यवसायात होतो फायदा; जाणून घ्या वापरण्याची पद्धत

कधी आणि कशी द्यावी घड्याळाची भेट
घड्याळ हे केवळ वेळ दाखवणारे यंत्र नसून, ते 'वेळे'चे आणि जीवनाच्या गतीचे प्रतीक आहे, असे ज्योतिष व वास्तूशास्त्रातील तज्ज्ञ सांगतात. यामुळे, घड्याळ भेट देताना सर्व बाबींचा विचार करावा. एखाद्या व्यक्तीला घड्याल द्यायचेच असेल तर, मनगटावरील घड्याळ देण्याऐवजी भिंतीवरील घड्याळ द्यावे. घड्याळ मंदिर, शाळा, धार्मिक ठिकाण किंवा गरजवंत व्यक्तीला भेट किंवा दान म्हणून दिले, तर ते सकारात्मक मानले जाते.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही. )


सम्बन्धित सामग्री