Wednesday, August 20, 2025 05:42:52 AM

Indian Railways : भारतातल्या 'या' रेल्वे स्टेशनवरून चारी दिशांना जातात गाड्या.. हे आहे सर्वात गजबजलेलं जंक्शन

तुम्हाला माहीत आहे का, भारतात एक असे रेल्वेस्थानक आहे, जिथून तुम्हाला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाणारी ट्रेन सहजपणे मिळू शकते. या रेल्वे स्थानकावरून देशात सर्व दिशांना गाड्या जातात.

indian railways  भारतातल्या या रेल्वे स्टेशनवरून चारी दिशांना जातात गाड्या हे आहे सर्वात गजबजलेलं जंक्शन

India’s most connected railway station : भारतीय रेल्वे देशभरात 12 हजारांहून अधिक गाड्या चालवते. दररोज सुमारे 2.5 कोटी लोक रेल्वे प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. भारतात रेल्वे ही सर्वांत मोठी आणि महत्त्वाची वाहतूक व्यवस्था आहे. लांबचा प्रवास करण्यासाठी सर्वांत सोईस्कर आणि परवडणारी वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे प्रवासासाठी लोकांची रेल्वेलाच अधिक पसंती असते.

काही वेळा आपल्याला असा अनुभव येतो की, आपल्याला एखाद्या गावी जायचे असते. मात्र, त्या गावी आपल्या जवळच्या रेल्वे स्थानकावरून थेट गाडी नसते. अशा वेळेस एखाद्या स्टेशनवर गाडी बदलून दुसरी गाडी पकडावी लागते. त्यामुळे प्रवासात दोन-तीन वेळा बदल करावे लागतात, वेळही जास्त लागतो व प्रवासही त्रासदायक होतो.
परंतु, तुम्हाला माहीत आहे का, भारतात एक असे रेल्वेस्थानक आहे, जिथून तुम्हाला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाणारी ट्रेन सहजपणे मिळू शकते. या रेल्वे स्थानकावरून देशात सर्व दिशांना गाड्या जातात. हे भारतातलं सर्वात मोठं गजबजलेलं जंक्शन आहे. हे आहे मथुरा जंक्शन.

हेही वाचा - Railway Scheme : रेल्वे तिकिटांवर 20 टक्के सूट, तुम्हीही गर्दीपासून वाचाल; अशी आहे रेल्वेची नवीन योजना

हे रेल्वे स्थानक उत्तर मध्य रेल्वे विभागात येते आणि देशातील प्रमुख रेल्वेमार्गांवर प्रवास करणाऱ्या गाड्या येथे ये-जा करतात. त्यामुळे भारतभर प्रवास करणाऱ्या गाड्यांसाठी मथुरा जंक्शन हे महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरलं आहे. अर्थातच, हे देशातलं अत्यंत गजबजलेलं रेल्वे स्थानक आहे. येथे दिवस-रात्र, 24 तास येथे गाड्यांची सतत ये-जा सुरूच असते.
उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये येथून थेट ट्रेन सेवा सुरू असते. येथून उत्तर भारतातील जम्मू-काश्मीरपासून ते दक्षिणेतील कन्याकुमारीपर्यंत, पूर्वेतील आसामपासून ते पश्चिमेतील गुजरात आणि महाराष्ट्रापर्यंत थेट ट्रेन सेवा चालते. विशेष म्हणजे दिल्लीतून दक्षिण भारतात जाणाऱ्या बहुतेक गाड्या मथुरा जंक्शनवरूनच जातात. त्यामुळे हे स्थानक एक महत्त्वपूर्ण जंक्शन बनले आहे. दररोज जवळपास 197  रेल्वेगाड्या येथे थांबतात, त्यामध्ये राजधानी एक्स्प्रेस, शताब्दी, दुरंतो, सुपरफास्ट, एक्स्प्रेस, तसेच लोकल DEMU/MEMU गाड्यांचा समावेश आहे.

1875 साली रेल्वे संचालनालयातर्फे मथुरा जंक्शन सुरू झाले. या स्थानकामध्ये एकूण 10 प्लॅटफॉर्म्स आहेत, जे देशातील प्रगत आणि सुविधा-संपन्न स्थानकांपैकी एक मानले जातात. येथून एकाच वेळी पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण या सगळ्या दिशांकडे जाणाऱ्या गाड्या सुटतात.

मथुरा जंक्शनच नाही, तर मथुरा हे शहरही खास आहे. हे उत्तर प्रदेशात आहे. भगवान श्रीकृष्णांच्या जन्मामुळे मथुरा नगरी पवित्र मानली जाते. येथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. याही कारणामुळे हे स्टेशन नेहमी गर्दीने भरलेलं असतं. येथून भारतातल्या वेगवेगळ्या तीर्थस्थानांकडे जाणाऱ्या गाड्याही मिळतात. येथून देशाच्या चारही दिशांना जाण्यासाठी थेट ट्रेन उपलब्ध असतात.

हेही वाचा - IRCTC: 45 पैशांमध्ये रेल्वेचा 10 लाखांचा विमा! ट्रेनमधून प्रवास करण्याआधी जाणून घ्या ही सुविधा


सम्बन्धित सामग्री