Wednesday, August 20, 2025 10:22:20 PM

लंकेंनी अमित शाह यांच्यासोबतच्या फोटोचा सांगितला भन्नाट किस्सा

हे खासदार भगरे गुरुजी भारती पवार यांना पाडून आले, हे बजरंग बप्पा सोनावणे पंकजा ताईंना पाडून आले, हे खासदार कल्याण काळे रावसाहेब दानवे यांना पाडून आले आणि मी निलेश लंके विखेंना पाडून आलो.

लंकेंनी अमित शाह यांच्यासोबतच्या फोटोचा सांगितला भन्नाट किस्सा

अहिल्यानगर: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी अमित शाह यांच्यासोबत फोटो काढण्याबद्दलचा एक मजेशीर किस्सा सांगितला. खासदार झाल्यानंतर लंके लोकसभेत गेले होते, तेव्हा अमित शाह यांची भेट झाली. त्यावेळी लंकेंसोबत बजरंग बप्पा, भगरे गुरुजी आणि कल्याण काळे उपस्थित होते.

अमित शाह यांच्यासोबत सर्वांनी फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा मी अमित शाह जात असताना तुमच्यासोबत फोटो काढायचा असल्याचं म्हटलं. तेव्हा ''सर्वांची ओळख करून दिली. हे खासदार भगरे गुरुजी भारती पवार यांना पाडून आले, हे बजरंग बप्पा सोनावणे पंकजा ताईंना पाडून आले, हे खासदार कल्याण काळे रावसाहेब दानवे यांना पाडून आले आणि मी निलेश लंके विखेंना पाडून आलो.'' हा किस्सा सांगताच सभास्थळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.


सम्बन्धित सामग्री