Wednesday, September 03, 2025 05:04:28 PM

प्रदर्शनाआधीच 'पुष्पा 2' ची सुपरहिट कमाई

तीन वर्षांपासून प्रेक्षक वाट पाहत असलेल्या 'पुष्पा 2: द रूल' चित्रपट प्रदर्शित

प्रदर्शनाआधीच पुष्पा 2 ची सुपरहिट कमाई

मुंबई : पुष्पा चित्रपटानंतर प्रेक्षकांना आतुरता होती हि पुष्पा 2 चित्रपटाची. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचे मोठ्या प्रमाणात चाहते आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रेक्षक वाट पाहत असलेल्या 'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट दिनांक 5 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या आगाऊ बूकिंगची सुरुवात ही 30 नोव्हेंबर रोजी सुरु झाली होती. या चित्रपटानं 24 तासात तब्बल 7.08 कोटींची कमाई केली होती. 'पुष्पा 2' विषयी प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. यामुळे हा चित्रपट आणखीनच हिट ठरणार आहे. 

संपूर्ण देशात 8 कोटी 81 लाख पेक्षा जास्त तिकिटांचं आतापर्यंत बूकिंग झालं आहे. त्याप्रमाणे पहिल्या दिवशी आगाऊ बूकिंग आधीच  'पुष्पा 2' नं 8.8 कोटींची कमाई केली असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर आगाऊ बुकिंगच्या पहिल्या दिवशी काही तासांमध्ये 'पुष्पा 2' च्या 55 हजार पेक्षा जास्त तिकिटं आतापर्यंत विकली गेली आहे.

त्यामुळे सर्वांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. दरम्यान 'पुष्पा 2: द रूल' हा चित्रपट हिंदी चित्रपटांमध्ये सर्वात जास्त आगाऊ बूकिंग करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सहभागी झाला असून  बिहार, गुजरात, आसाम आणि छत्तीसगडमध्ये या चित्रपटाची तिकिट मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे. 


सम्बन्धित सामग्री