Wednesday, August 20, 2025 02:06:19 PM

Mega block Update: रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

मुंबईत प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आणि विशेषतः NEET 2025 परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी.

mega block update रविवारी मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

मुंबई: मुंबईत प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी आणि विशेषतः NEET 2025 परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या रविवारी, 4 मे 2025 रोजी होणाऱ्या नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्य मार्गिका, हार्बर मार्ग आणि ट्रान्स-हार्बर मार्गिका या तीनही प्रमुख रेल्वे मार्गांवर कोणताही मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांना वेळेवर आणि विनाअडथळा परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

नेहमीप्रमाणे रविवारी रेल्वे विभागाकडून देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. मात्र, या वेळी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या सोयीसाठी प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत ब्लॉक टाळण्याचा निर्णय घेतला आहे. NEET परीक्षा ही देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची प्रवासातील गैरसोय टाळण्याचा प्रयत्न म्हणून हा निर्णय स्वागतार्ह ठरत आहे. यामुळे विशेषतः उपनगरी भागातून परीक्षा केंद्रांपर्यंत प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

दरम्यान, पश्चिम रेल्वेनेही या निर्णयाला अनुसरून दिवसभराचा मेगाब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला असला तरी, शनिवारी मध्यरात्रीपासून काही तांत्रिक देखभालीसाठी मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकादरम्यान चार तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. हा ब्लॉक शनिवार रात्री 12.15 पासून ते रविवारी पहाटे 4.15 पर्यंत लागू राहील. या कालावधीत सांताक्रूज ते चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या जलद लोकलगाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. 


सम्बन्धित सामग्री