Wednesday, August 20, 2025 05:08:55 AM

सतीश भोसलेच्या तक्रारीला न्यायालयाने फेटाळले, वकिलांनी मारहाणीचा दावा केला

बीड वनविभागाच्या ताब्यात सतीश भोसलेला मारहाण झालीच नाही, वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही बंद असल्याचा आरोप

सतीश भोसलेच्या तक्रारीला न्यायालयाने फेटाळले वकिलांनी मारहाणीचा दावा केला

सतीश भोसलेला वनविभागाच्या ताब्यात असताना मारहाण झालीच नाही

बीड: वनविभागाच्या ताब्यात असताना आरोपी सतीश भोसलेला मारहाण झाली नसल्याचा खुलासा अधिकृत वैद्यकीय अहवालातून समोर आला आहे. सतीश भोसले याने तक्रार केली होती की, वनविभागाच्या ताब्यात असताना त्याला मारहाण झाली. त्याच्या तक्रारीच्या आधारावर न्यायालयाने वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले होते. तपासणीत अहवालात सतीश भोसलेच्या अंगावर कोणत्याही नवीन जखमेचे व्रण नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे न्यायालयाने त्याने दाखल केलेला अर्ज रद्द केला आहे.

👉👉 हे देखील वाचा : 31 किलो गांजा जप्त; मुंबई - आग्रा महामार्गावर तस्करी रॅकेटचा पर्दाफाश

बीड वनविभागाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून, सतीश भोसले याला कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी त्याच्यावर कोणतीही अनिष्ट वागणूक केली नसल्याचे सांगितले आहे. तक्रारीच्या विरोधात वकिलांकडून मात्र सतीश भोसलेला मारहाण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सतीश भोसलेचे वकील अ‍ॅड. अंकुश कांबळे यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फूटेज बंद असल्यामुळे मारहाणीचा प्रकार लपवण्यात आला गेला.

या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सतीश भोसलेने नेमकी तक्रार का केली? तर दुसरीकडे, वनविभागाच्या ताब्यात असताना त्याच्यावर कोणतीही अनिष्ट वागणूक झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 


 


सम्बन्धित सामग्री