Wednesday, August 20, 2025 09:30:00 AM

Big News : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शापूरजी पालनजी ग्रुप अखेर टाटा सन्समधून बाहेर पडण्याची तयारीत

शापूरजी पालनजी ग्रुप टाटा सन्समधील त्यांचा 18.4% हिस्सा विकून 8,810 कोटी रुपयांचे बाँड फेडण्याची योजना आखत आहे. यामुळे समूहाची आर्थिक स्थिती सुधारेल.

big news  कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शापूरजी पालनजी ग्रुप अखेर टाटा सन्समधून बाहेर पडण्याची तयारीत

Shapoorji Pallonji Group May Exit From Tata Sons : शापूरजी पालनजी ग्रुप टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडमधील त्यांचा 18.4% हिस्सा विकू शकतो. या संभाव्य विक्रीतून मिळालेली रक्कम समूहाला मोठ्या प्रमाणात कर्ज फेडण्यासाठी वापरता येईल. ब्लूमबर्गच्या एका अहवालात सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, कंपनीने त्यांच्या पायाभूत सुविधा युनिट गोस्वामी इन्फ्राटेक प्रायव्हेट लिमिटेड द्वारे जारी केलेले 8,810 कोटी रुपयांचे बाँड फेडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे बाँड एप्रिल 2026 मध्ये मॅच्युअर होतील.

सूत्रांचे म्हणणे आहे की, हे कर्ज पूर्ण किंवा अंशतः फेडल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि समूहाच्या इतर भांडवली प्रकल्पांनाही चालना मिळेल. तथापि, या चर्चा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहेत आणि भविष्यात बदल शक्य आहेत. शापूरजी ग्रुप आणि टाटा सन्स यांनी या विषयावर कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही.

हेही वाचा - रेल्वे तिकिटांवर 20% सूट, तुम्हीही गर्दीपासून वाचाल; अशी आहे रेल्वेची नवीन योजना

या समूहाने 3.4 अब्ज डॉलर्स उभारले आहेत
इकॉनॉमिक टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे. टाटा सन्सने शापूरजी पालनजी ग्रुपशी त्यांच्या हिस्सेदारीतून बाहेर पडण्यासाठी पर्याय शोधण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. फक्त तीन महिन्यांपूर्वी शापूरजी ग्रुपने तीन महिन्यांपूर्वीच भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्रेडिट डील अंतर्गत 3.4 अब्ज डॉलरची फंडिंग मिळवली होती. त्यानंतर ही बातमी समोर आली आहे. तसेच ग्रुप आपली बांधकाम आणि अभियांत्रिकी कंपनी एफकॉन्स (Afcons) चा 8,500 कोटी रुपयांचा आयपीओ (IPO) आणण्याचीही तयारी करत आहे.

गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्याचे उद्दिष्ट
जर टाटा सन्सच्या हिस्सेदारीच्या विक्रीतून मिळालेला पैसा बाँड भरण्यासाठी वापरला गेला तर यामुळे शापूरजी ग्रुपचा कर्जाचा खर्च कमी करण्यास मदत होईल. मे महिन्यात झालेल्या करारात कंपनीने 19.75% उत्पन्न देऊ केले होते. याशिवाय, गेल्या महिन्यात बँकिंग नियामकाकडून मिळालेल्या महत्त्वपूर्ण सवलतीमुळे कंपनीला या डीलची किंमत वाढण्यापासून वाचवता आली.

जर ही डील झाली नाही तर एसपी ग्रुप काय करेल?
सूत्रांनी असेही सांगितले की, जर टाटा सन्सची हिस्सेदारी विक्री योजना पुढे सरकली नाही, तर शापूरजी नोव्हेंबरमध्ये 2026 च्या  गोस्वामी कर्जासाठी पुनर्वित्त (refinancing) चर्चा सुरू करण्याची योजना आखत आहेत. कंपनीची आर्थिक स्थिती स्थिर करण्यासाठी आणि भविष्यातील प्रकल्पांसाठी भांडवल उभारण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरू शकते.

हेही वाचा - अमेरिका-चीन संघर्ष... पंतप्रधान मोदींचा आजच्या बैठकीत हा निर्णय, चिप मार्केटबाबत एक मोठे पाऊल!


सम्बन्धित सामग्री