Saturday, September 06, 2025 06:18:41 AM

BCCI Hikes Jersey Sponsorship Rates: टीम इंडियाच्या जर्सीचे प्रायोजकत्व आता महाग होणार; बीसीसीआयने वाढवले ​​दर

नवीन दरांनुसार, द्विपक्षीय मालिकांसाठी प्रति सामना 3.5 कोटी रुपये आणि बहु-राष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रति सामना 1.5 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

bcci hikes jersey sponsorship rates टीम इंडियाच्या जर्सीचे प्रायोजकत्व आता महाग होणार बीसीसीआयने वाढवले ​​दर

BCCI Hikes Team India Sponsorship Rates: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने टीम इंडियाच्या जर्सी प्रायोजकत्वाच्या दरांमध्ये मोठा बदल केला आहे. यापुढे कोणत्याही कंपनीला टीम इंडियाच्या जर्सीवर लोगो लावण्यासाठी आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील. नवीन दरांनुसार, द्विपक्षीय मालिकांसाठी प्रति सामना 3.5 कोटी रुपये आणि बहु-राष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रति सामना 1.5 कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

भारतीय संघ सध्या ड्रीम 11 चा प्रायोजक करार संपल्यामुळे जर्सीवर कोणताही प्रायोजक नसताना खेळत आहे. सरकारने 2025 मध्ये लागू केलेल्या ऑनलाइन गेमिंग प्रमोशन अँड रेग्युलेशन अॅक्ट नंतर ड्रीम 11 ने जर्सी प्रायोजकत्वातून माघार घेतली होती. यापूर्वी द्विपक्षीय सामन्यांसाठी 3.17 कोटी रुपये आणि बहु-राष्ट्रीय स्पर्धांसाठी 1.12 कोटी रुपये निश्चित होते, त्यामुळे नवीन दरांमध्ये किंचित वाढ झाली आहे. या बदलातून BCCI ला 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई होण्याची अपेक्षा आहे, परंतु अंतिम आकडा बोली प्रक्रियेवर अवलंबून असेल.

हेही वाचा Asia Cup 2025: भारताचा पहिला सामना कधी आणि कोणाविरुद्ध? इथे पाहता येणार आशिया कप लाईव्ह स्ट्रीमिंग

नवीन दरांची अंमलबजावणी - 

नवीन दर आगामी आशिया कप नंतर लागू होतील. तथापि, भारतीय संघ आशिया कपमध्ये कोणत्याही जर्सी प्रायोजकाशिवाय खेळेल, कारण बीसीसीआयने नवीन बोली सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर निश्चित केली आहे. बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की बोली लावणारी कोणतीही कंपनी ऑनलाइन मनी गेमिंग, बेटिंग किंवा जुगाराशी संबंधित असू नये आणि अशा व्यवसायांमध्ये गुंतवणूक किंवा मालकी असू नये.

हेही वाचा - GST Impact on IPL Ticket : क्रीडाप्रेमींच्या खिशाला फटका ! आयपीएल तिकिटांच्या किंमती वाढणार, जाणून घ्या

आशिया कप शेड्यूल - 

दरम्यान, 9 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या आशिया कपमध्ये भारतीय संघ पहिल्यांदा 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध खेळेल. नंतर 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील, तर 19 सप्टेंबर रोजी लीग टप्प्यात भारताचा सामना ओमानशी होईल. BCCI च्या या महागड्या दरांमुळे भविष्यातील जर्सी प्रायोजक कोण ठरतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.


सम्बन्धित सामग्री