Wednesday, August 20, 2025 04:32:02 AM

OMG! एलोन मस्कच्या शाळेत एका तासाची फी 1.88 लाख रुपये

ही शाळा मुलांना पारंपारिक शिक्षण व्यवस्थेपासून दूर व्यावहारिक आणि सर्जनशील विचार करण्याचे शिक्षण देते. ही पूर्णपणे ऑनलाइन शाळा आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची आवश्यकता नाही.

omg एलोन मस्कच्या शाळेत एका तासाची फी 188 लाख रुपये
Elon Musk
Edited Image

वाशिंग्टन: अमेरिकन उद्योजक एलोन मस्क यांनी आता शिक्षणाच्या जगात प्रवेश केला आहे. त्यांनी एक नवीन आणि अनोखी शाळा सुरू केली आहे. या शाळेचे नाव अ‍ॅस्ट्रा नोव्हा स्कूल आहे. ही शाळा मुलांना पारंपारिक शिक्षण व्यवस्थेपासून दूर व्यावहारिक आणि सर्जनशील विचार करण्याचे शिक्षण देते. ही पूर्णपणे ऑनलाइन शाळा आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची आवश्यकता नाही. जगभरातील मुले येथे प्रवेश घेऊ शकतात. या शाळेचा उद्देश मुलांना फक्त पुस्तकांपुरते मर्यादित ठेवणे नाही. त्यांना वैचारिक स्वातंत्र्य, समस्या सोडवण्याची कला आणि वास्तविक जगाशी जोडणे आहे.

शाळेत घेण्यात येत नाही परीक्षा - 

एलोन मस्क यांची ही शाळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. या शाळेत अभ्यासासोबतच मजेशीर खेळांचा समावेश आहे, जेणेकरून मुलांना कंटाळा येणार नाही. परंतु, सर्वसामान्यांना या शाळेत शिक्षण घेणे खूप महाग आहे. प्राप्त माहितीनुसार, ही शाळा पारंपारिक शिक्षण व्यवस्थेचा भाग नाही. त्याच्या अभ्यासक्रमात अंकांचा किंवा परीक्षांचा त्रास नाही. म्हणजे या शाळेत कोणतीही परीक्षा घेण्यात येत नाही. तसेच विद्यार्थ्यांना कोणतेही गुण दिले जात नाहीत. 10 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी असलेली ही ऑनलाइन शाळा तार्किक विचारसरणी, नवोपक्रम आणि वास्तविक जीवनातील समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करते. 

हेही वाचा - एलोन मस्कच्या SpaceX Starship रॉकेटचा चाचणीदरम्यान स्फोट

पूर्णवेळ आणि अर्धवेळ प्रवेशाचा पर्याय उपलब्ध - 

तथापी, या अनोख्या शाळेत मुलांच्या गरजेनुसार पूर्णवेळ आणि अर्धवेळ प्रवेशाचा पर्याय उपलब्ध आहे. ही एक प्रायोगिक शाळा आहे, त्यामुळे प्रत्येक सत्रात नवीन कल्पना आणि अध्यापन पद्धती स्वीकारल्या जातात. या शाळेतील वर्गामध्ये फक्त 6 ते 16 मुले असतात. या वर्गात बीजगणित 1, भूमिती, बीजगणित 2 आणि प्री-कॅल्क्युलससारखे विषय येथे शिकवले जातात. ज्यांना अधिक मदतीची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी 'आर्ट ऑफ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग' नावाचा एक विशेष वर्ग देखील आहे. 

हेही वाचा - ट्रम्प-मस्क यांच्यातील वाद संपला! एलोन मस्कने गेल्या आठवड्यात एक्सवर लिहिलेल्या पोस्टवर व्यक्त केला खेद

एलोन मस्कच्या शाळेची फी - 

एलोन मस्कच्या शाळेची फी प्रति वर्ग शुल्क: 1.88 लाख (2200 डॉलर) प्रति तास असून किमान 2 तासांचे वर्ग अनिवार्य आहेत. तथापी, एकूण शुल्क (जास्तीत जास्त) 30 लाख (सुमारे 35200 डॉलर) पर्यंत असू शकते. तथापि, शाळेकडून आर्थिक मदत आणि शिष्यवृत्ती सुविधा देखील प्रदान केल्या जातात. 
 


सम्बन्धित सामग्री