Wednesday, August 20, 2025 02:07:34 PM

काय आहे नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प?

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नव्याने तयार करण्यात येत असलेला आराखडा अंतिम टप्प्यात

काय आहे नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प

नाशिक : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा नव्याने तयार करण्यात येत असलेला आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे. अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांनी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी भेट घेत नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. यावेळी त्यांनी नव्याने तयार करण्यात येत असलेला आराखडा अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं आहे. 

प्रकल्पाबाबत काय म्हणाले राजाभाऊ वाजे? 

नाशिक-पुणे मार्गात बदल करून नाशिक- शिर्डी- पुणे केल्याबद्दलचा साधा प्रस्तावही दाखल झालेला नाही. त्यामुळे दोन वर्षांत या रेल्वेमार्गाची फाईल कोणत्याही चर्चेविना केंद्रीय रेल्वे मंत्रालयात अक्षरश: धूळ खात पडल्याचे वास्तव खासदार वाजे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग 2021 च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून तो उभारला जाणार असल्याची माहिती देखील येवेळी देण्यात आली आहे. 

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प? 

नाशिक-संगमनेर-पुणे या तीन महत्त्वाच्या भागांच्या विकासात भर पाडणाऱ्या 232 किलोमीटरच्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प प्रस्तावित आहे. या रेल्वेमुळे तिन्ही भागांतील कृषी व औद्योगिक विकासालाही चालना मिळणार आहे.

दरम्यान महारेलने बनविलेल्या डीपीआरमध्ये नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’मधून रेल्वेमार्ग प्रस्तावित होता.  परंतु नव्याने तयार होत असलेल्या डीपीआरमध्ये जीएमआरटीला वळसा दिला जाणार आहे. यामुळे किमान 60 ते 90 किलोमीटर अंतर वाढून अर्ध्या तासाचा वेळ देखील वाढणार आहे.


सम्बन्धित सामग्री