best vegetables for healthy skin
best vegetables for healthy skin : माणसाच्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग्य आहार आवश्यक असतो. आज काल प्रत्येकजण तरुण आणि आकर्षक दिसण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण त्यासाठी केवळ सौंदर्य प्रसाधनांचा वापर न करता आहारात पोषणमूल्य असलेले घटक समाविष्ट करणं देखील तितकचं गरजेचं आहे. माणसाच्या त्वचेला सर्वाधिक नुकसान हे प्रदूषण आणि सूर्याच्या हानिकारक किरणांमुळं होतं. त्यामुळं त्वचा निरोगी ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे. याचा आढावा आपण या लेखातून घेऊयात. यामध्ये आपल्या आहारात काही विशिष्ट भाज्यांचा समावेश करणं खूपच फायदेशीर ठरतं. त्या भाज्या कोणत्या आहेत? चला तर मग पाहुयात..
लाल शिमला मिरची -
लाल शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. जे कोलेजन निर्मितीस मदत करतं. कोलेजन हे त्वचेला टाइट आणि तरुण ठेवण्यासाठी आवश्यक असतं. याशिवाय शिमला मिरचीमध्ये असलेले कॅरोटेनॉइड्स हे अँटीऑक्सिडंट्स त्वचेला सूर्यप्रकाश आणि प्रदूषणामुळं होणाऱ्या नुकसानीपासून वाचवतात. आपल्या आहारात जर संतुलीत लाल शिमला मिरचीचा समावेश केल्यास त्वचा तजेलदार राहते.
हेही वाचा - Rainy Season Alert: पावसाळ्यात 'या' भाज्या टाळाच! एक चुकीचा निर्णय ठरू शकतो आरोग्यास धोकादायक
बहुगुणी पालक
पालक तर बहुतांश घरामध्ये खाल्ली जाणारी भाजी आहे. पण याचे फायदे अनेकांना माहित नाहीत. पालक ही अत्यंत उपयुक्त भाजी आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी प्रचंड प्रमाणात असतो. ती त्वचेला नवजीवन देतात. पालकाचे सेवन केल्यानं त्वचा चमकदार होते आणि त्यातील पाण्याचे प्रमाण त्वचेला आतून हायड्रेट करतात. त्यामुळं पालक खाणं फायदेशीर ठरतं.
हेही वाचा - Best Breakfast For Diabetes: ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवण्यासाठी सकाळी खा 'हे' 3 सुपरनाश्ते, पचनशक्तीही राहील मजबूत
गाजर
गाजरात असलेला बीटा-कॅरोटीन हा घटक शरीरात व्हिटॅमिन एमध्ये परिवर्तित होतो. जे त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतं. गाजरामुळं सनबर्नचा धोका कमी होतो आणि त्वचा उजळते. सलाड स्वरूपात गाजराचं सेवन केल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात. बहुतांश लोक गाजर खातात पण त्यांना गाजर खाण्याचे फायदे माहित नसतात. गाजर खाल्यानं त्वचेसाठी खूप चांगला फायदा होतो.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)