Best supplement for stop hair fall: हल्ली प्रत्येकजण केस तुटणे, केस गळणे, पातळ होणे आणि केस निर्जीव होण्याबद्दल चिंतेत आहे. केसांच्या वाढ आणि दाटपणा (hair growth and thickness) मनासारखा असणारे लोक कमीच आहेत. शिवाय, स्वतःच्या केसांच्या आरोग्यावर खूश असणारे लोक स्वतःच्या केसांची स्तुती करताना दिसत नाहीत. केवळ पुरुषांनाच नाही तर, महिलांनाही केस गळण्याचा खूप त्रास होतो. पुरुषांना जसा कमी वयात टक्कल पडू लागण्याचा खूप त्रास होतो, तशाच पद्धतीने महिलांचाही केस गळण्यामुळे लुक खराब होऊ लागतो. तेव्हा, डोक्यावरील असलेले केस सुंदर, निरोगी होऊन त्यांची गळती थांबवण्यासाठी आणि नवीन केस वाढविण्यासाठी तुम्ही आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.
हेही वाचा - Blood Donation : रक्तदान केल्याने होतात 'हे' अगणित जादुई फायदे; नव्या संशोधनाने समोर आणली ही खास बाब
केस गळू लागल्याच्या समस्येची जाणीव झाल्यानंतर डोक्यावरील उरलेले केस टिकवून ठेवण्यासाठी आणि नवीन केस वाढविण्यासाठी लोक विविध उपाय करतात. ते बाजारात उपलब्ध असलेले महागडे केस वाढीसाठी पूरक आहार आणि केसांचे उपचार (Hair loss treatment) घेतात. पण बऱ्याचदा पैसे खर्च करूनही लोकांना अपेक्षित गुण येत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही काही आयुर्वेदिक आणि घरगुती उपायांचा अवलंब करून सतत केस गळण्याची समस्या कमी करू शकता. आवळा हे शरीराच्या आरोग्यासोबतच केसांच्या समस्यांवर अत्यंत गुणकारी फळ आहे. याचे नियमित सेवन करण्यासोबतच तो केसांना लावल्याने तुम्हाला खूप फायदे मिळतील. जाणून घेऊ, कसे..
केसांसाठी आवळा (Amla for Hair Growth)
आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. यामुळे केसांना अनेक प्रकारे फायदा होतो. आवळा केसांसाठी रामबाण औषध ठरतो. त्यात फायटोन्यूट्रिएंट्स आणि खनिजे असतात. यामुळे केसांच्या मुळांपाशी रक्ताभिसरण वाढते. याद्वारे, सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे टाळूपर्यंत म्हणजेच केसांच्या मुळांपर्यंत पोहोचण्यास मदत करतात.
आवळ्याचे सेवन केल्याने केसांना होतात हे फायदे
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि बी असते. याशिवाय, त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि कॅल्शियम देखील असते. एवढेच नाही तर आवळ्यामध्ये भरपूर फायबर आणि डाययुरेटिक अॅसिड असते, जे केसांसाठी फायदेशीर असते. यामुळे आवळा जरूर खावा. तसेच, आवळा पावडर करून अधिक काळासाठी ठेवता येते. तसेच, आवळ्याचा मुरंबा, लोणचे हेही तयार करून नेहमीच्या जेवणात त्याचे सेवन करावे. याशिवाय, केसांच्या समस्या नसतानाही आवळा नक्की खावा. यामुळे समस्या उद्भवण्याची शक्यता कमी होईल. आवळा केसांसाठी किती फायदेशीर आहे ते येथे जाणून घ्या.
- केसांच्या मुळांचे आणि डोक्याच्या त्वचेचे कंडीशनिंग होते.
- केसांचा दाटपणा वाढतो.
- नवीन निरोगी केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
- पांढऱ्या आणि राखाडी केसांची समस्या कमी होते.
- कोंडा कमी करण्यास मदत होते.
केस गळती थांबवण्यासाठी आणि नवीन केस वाढविण्यासाठी आवळा केसांना कसा लावावा?
तुम्ही कोरड्या आवळ्याची पेस्ट बनवू शकता आणि ती थेट केसांना लावू शकता. याशिवाय, तुम्ही चहाच्या पानांच्या पाण्यात आवळा पावडर मिसळून केसांना लावू शकता. जर तुम्हाला केसांना अंडे लावायचे असेल तर, तुम्ही त्यात आवळा पावडर मिसळून केसांना लावू शकता.
हेही वाचा - कुटुंबात डोळ्यांच्या समस्या अनुवांशिक असतील तर, मुलांना या 5 सवयी नक्की लावा; दृष्टी गरुडासारखी होईल तीक्ष्ण
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)