देशी तूप आणि लसूण एकत्र खाल्ल्यास आरोग्यासाठी वरदान! फायदे जाणून घ्या
भारतीयांच्या स्वयंपाकघरात अनेक पदार्थ असे आहेत जे आरोग्यासाठी वरदान मानले जातात. त्यातीलच एक प्रभावी आणि उपयुक्त मिश्रण म्हणजे देशी तूप आणि लसूण. हे दोन्ही घटक केवळ अन्नाची चव वाढवण्यासाठीच नाही तर शरीराला सशक्त आणि निरोगी ठेवण्यासाठीही महत्त्वाचे मानले जातात. आयुर्वेदातही या मिश्रणाचा उपयोग विविध प्रकारच्या आजारांवर उपाय म्हणून केला जातो.
लसणात अॅलिसिन, अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. तर तुपात आवश्यक फॅटी अॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स आढळतात. जेव्हा हे दोन्ही घटक एकत्र घेतले जातात तेव्हा त्यांचे औषधी गुणधर्म अधिक प्रभावी होतात.
हेही वाचा - उन्हाळ्यात सब्जा खाणे चांगले की चिया सीड्स?
देशी तुपात तळलेला लसून रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यासोबत खाल्यास याचे खूप फायदे आहेत. यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. तुपात तळलेला लसूण हृदयाच्या आरोग्यासाठी वरदान आहे. तो कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतो. रक्तवाहिन्यांमध्ये गाठ तयार होण्यापासून वाचवतो आणि रक्ताभिसरण सुधारतो. त्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. तसंच लसूण नैसर्गिकरित्या रक्तदाब कमी करण्यास मदत करतो. तुपातील चांगले फॅट्स आणि लसणातील अॅलिसिन घटक रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवून रक्तदाब संतुलित ठेवतात. याशिवाय सतत सर्दी, खोकला आणि इतर संसर्ग होत असल्यास, रोज सकाळी तुपात तळलेला लसूण खाल्याने यातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होते.
हेही वाचा - पचनासाठी फायदेशीर असणाऱ्या लिंबाचे फायदे जाणून घ्या
लसूण आणि तूप एकत्र घेतल्याने संधिवात, ल्युपस, थायरॉईड आणि शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते. तसेच लसूण जठरातील जंतू नष्ट करून अन्नपचन सुधारतो. देशी तूप पचनसंस्थेला गती देऊन बद्धकोष्ठता आणि आम्लपित्ताची समस्या दूर करते. लसूण आणि तूप शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत करतात. ज्यामुळे त्वचा तजेलदार होते आणि शरीर अधिक ऊर्जावान वाटते.
Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.