आजकाल, बर्गर, पास्ता, पिझ्झा, चायनीज किंवा इतर पाश्च्यात पदार्थांचे सेवन मोठ्या प्रमाणात केल्यामुळे अनेकजण विविध आजारांना बळी पडत आहेत. वेळेत न जेवल्यामुळे किंवा अस्थिर जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावरही दिसू लागतो. आजकाल वाढत्या कामाच्या दबावामुळे लोकांना आरामात जेवायलाही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत लोक फास्ट फूडकडे जास्त आकर्षित होत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पिझ्झा.
सध्याच्या 90% तरुणपिढींचा आवडता पाश्च्यात पदार्थ म्हणजे पिझ्झा. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना पिझ्झाचे वेड लागले आहे. ऑर्डर केल्याच्या अर्ध्या तासात घरी पोहोचणारा पिझ्झा स्वादिष्ट लागतो, पण जर तुम्ही तो मर्यादित प्रमाणात खाल्ला तर. पिझ्झाचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. चला तर सविस्तर जाणून घेऊया पिझ्झा खाण्याचे फायदे आणि तोटे.
पिझ्झा खाण्याचे फायदे:
ऊर्जा समृद्ध: पिझ्झामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळण्यास मदत होते.
पौष्टिक मूल्य: पिझ्झामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या आणि खाद्य पदार्थ असतात, जसे की कॉर्न, टोमॅटो, ऑलिव्ह, मशरूम. जर यांचा योग्य प्रमाणात वापर केला तर ते फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे काही पोषक घटक प्रदान करतात, ज्यामुळे तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होतो.
कॅल्शियमचा स्त्रोत: पिझ्झामध्ये असलेले चीज हा पदार्थ कॅल्शियमचा एक चांगला स्त्रोत आहे. हे पदार्थ तुमच्या हाडांच्या आणि दातांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे.
सकारात्मक हार्मोन: पिझ्झा खाल्ल्याने त्यामध्ये असलेले चीज आणि कार्ब्स दोन्ही मिळून डोपामाइन नावाचे 'सकारात्मक' हार्मोन सोडतात. या हार्मोनमुळे सकारात्मक वाटू लागते.
पिझ्झा खाण्याचे तोटे:
चरबी आणि कॅलोरीमुळे वजन वाढण्याची शक्यता: पिझ्झामध्ये मोठ्या प्रमाणात चीज, मैदा आणि इतर गोष्टींपासून बनवले जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणात चरबी आणि कॅलोरी असतात, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.
उच्च सोडियम पातळी: पिझ्झामध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉसेज, पेपरोनी आणि चीजमध्ये जास्त प्रमाणात मीठ असते. त्यामुळे रक्तदाबाचा प्रमाण वाढतो.
पचनक्रियेत होणाऱ्या अडचणी: बाजारात मिळणारा पिझ्झा अधिकतर रिफाइंड मैद्यापासून बनवला जातो. हे पचायला थोडं कठीण असतं, ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.
हृदयविकाराचा धोका: पिझ्झाची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये जास्त प्रमाणात चीजचा वापर होतो. ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढतो आणि हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)