तुमच्या केसांची वाढ कमी झाली आहे का? केस गळतीमुळे तुम्ही त्रस्त आहेत? तर तुमच्यासाठी एक नैसर्गिक उपाय उपलब्ध आहे- राजेमारी ऑइल(Rosemary oil)! हे तेल केसांच्या वाढीस चालना देण्यास मदत करते आणि वैद्यकीयदृष्ट्या देखील प्रभावी मानले जाते.
रोजमेरी ऑइल म्हणजे काय?
राजेमारी ऑइल(Rosemary oil) हे एक नैसर्गिक तेल आहे जे अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. हे तेल डोक्यतील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना बळकट करते, त्यामुळे केसांची वाढ जलद गतीने होते.
हेही वाचा : थंड पाण्याने केस धुणे फायदेशीर
डॉ. कुणाल सूद यांचे मत
प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. कुणाल सूद यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी रोजमेरी ऑइलच्या(Rosemary oil) फायद्यांविषयी चर्चा केली आहे. त्यांच्या मते, 'रोजमेरी तेल(Rosemary oil) प्राचीन काळापासून वापरले जात आहे आणि केसांच्या वाढीसाठी हे एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. याशिवाय, हे तेल तणाव कमी करण्यासाठी आणि अनिद्रा दूर करण्यासाठी देखील प्रभावी आहे.'
हे तेल कसे कार्य करते?
रोजमेरी ऑइल (Rosemary oil) डोक्यातील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या मुळांना आवश्यक पोषण मिळवून देते. यामुळे केस गळती कमी होते आणि नवीन केसांची वाढ होण्यास मदत होते. विशेष म्हणजे, हे तेल केसांच्या रोमछिद्रांना सक्रिय करून त्यांचे पोषण करते, ज्यामुळे मजबूत आणि निरोगी केसांची वाढ होते.
हेही वाचा : Benifits of Body Massage: बॉडी मसाज केल्याचे फायदे तुम्हाला माहित आहे का?
रोजमेरी ऑइलचा वापर कसा करावा?
डॉ. कुणाल सूद यांच्या मते, रोजमेरी ऑइल (Rosemary oil) वापरण्याचे काही सोपे आणि प्रभावी मार्ग पुढीलप्रमाणे आहेत:
1. मालिश: रोजमेरी तेलाच्या काही थेंबांना खोबरेल किंवा बदाम तेलात मिसळा आणि हलक्या हाताने डोक्याला मालिश करा.
2. रात्री लावा: हे तेल रात्री केसांना लावून ठेवा आणि सकाळी सौम्य शॅम्पूने धुवा.
3. शॅम्पूमध्ये मिसळा: काही थेंब रोजमेरी ऑइल शॅम्पूमध्ये मिसळून केस धुवा.
4. साप्ताहिक वापर: आठवड्यातून 2-3 वेळा हे तेल वापरल्याने सर्वोत्तम परिणाम मिळू शकतात.