Cancer Risk: बहुतेक लोक सकाळी ऑफिसची किंवा कॉलेजची घाई असल्यामुळे केवळ दोन मिनिटांत घाईघाईने ब्रश करून बाथरूममधून बाहेर पडतात. पण हीच सवय तुमचं आरोग्य गंभीर संकटात टाकू शकते. ओरल हेल्थ म्हणजे केवळ दातांची स्वच्छता नव्हे, तर संपूर्ण शरीराच्या आरोग्याशी संबंधित एक महत्त्वपूर्ण बाब आहे.
दिल्लीच्या डेंटिस्ट डॉ. नीतू अग्रवाल यांच्या मते, चुकीच्या पद्धतीने किंवा कमी वेळ ब्रश केल्यामुळे केवळ दातांची सडण किंवा मसूड्यांचे आजार होत नाहीत, तर गळा, तोंड व अन्नप्रणाली म्हणजेच एसोफॅगस कॅन्सरचाही धोका वाढतो.
कसे वाढते कॅन्सरचे संकट?जेव्हा आपण नीट ब्रश करत नाही, तेव्हा तोंडात हानिकारक बॅक्टेरिया जमा होतात. यामुळे मसूड्यांमध्ये सूज निर्माण होते, ज्याला पेरिओडोंटल रोग म्हणतात. ही सूज दीर्घकाळ राहिल्यास शरीरात कॅन्सर पेशी वाढण्यास पोषक वातावरण तयार होते. हेच बॅक्टेरिया व त्यांच्या विषारी घटक रक्तप्रवाहात जाऊन शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम करतात. त्यामुळे शरीराच्या अन्य भागांनाही धोका वाढतो.
हेही वाचा:Health Tips: औषधं फेल, पण 'भेंडीचं पाणी' पास; डायबिटीज कंट्रोलसाठी आजमावाच
डिमेन्शिया आणि इन्फेक्शनचा धोका
अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की, नीट ब्रश न केल्यामुळे फक्त कॅन्सरच नव्हे तर डिमेन्शिया म्हणजेच स्मृतिभ्रंशासारखे मानसिक आजार देखील होऊ शकतात. मेंदूत सूज, दातांमध्ये संसर्ग अशा गंभीर समस्या निर्माण होतात.
दारू आणि तंबाखू; कॅन्सरचे धोकादायक भागीदारजर तोंडाची स्वच्छता नीट ठेवली गेली नाही आणि त्यात दारू किंवा तंबाखूचे सेवन सुरू असेल, तर गळा आणि तोंडाच्या कॅन्सरचा धोका अनेकपटींनी वाढतो. खराब ओरल हेल्थमुळे शरीरात एचपीव्ही (Human Papillomavirus) चा संसर्ग होण्याची शक्यता वाढते, जो कॅन्सरचा एक मुख्य कारण ठरतो.
हेही वाचा: vitamin B12 Deficiency: शाकाहारी आहात? मग ‘या’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करू नका
कशी घ्यावी काळजी?
डॉ. चेतना अवस्थी सांगतात की, चांगली ओरल हेल्थ राखण्यासाठी खालील गोष्टी पाळणं गरजेचं आहे. दिवसातून दोन वेळा, किमान दोन मिनिटे नीट ब्रश करा. केवळ दात नव्हे, तर जीभ आणि मसूडेही स्वच्छ करा. दररोज फ्लॉसिंग करा, म्हणजे दातांमधील अन्नकण आणि प्लाक निघून जातो. अँटीबॅक्टेरियल माउथवॉश वापरा. दर सहा महिन्यांनी डेंटिस्टकडे तपासणीसाठी जा. धूम्रपान व मद्यपान टाळा, कारण ते तोंडाच्या आरोग्यासाठी घातक आहे. संतुलित आहार घ्या.
तोंडाचा आरोग्य केवळ हास्यासाठी नव्हे, तर तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. एक चुकीची सवय, एक छोटी घाई तुमचं आरोग्य गंभीर संकटात टाकू शकते. त्यामुळे आजपासूनच आपल्या ओरल हेल्थकडे लक्ष द्या आणि प्रत्येक ब्रश तुमच्या दीर्घायुष्याची पायरी बनवा.
(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधावा.)