Monday, September 01, 2025 12:55:00 AM

तुम्हीही वजन कमी करण्याच्या विचारात आहात? मग घ्या 'हा' काढा

अनेकजण वजन कमी करण्यासाठी  जिमला जातात किंवा पौष्टिक आहार घ्यायला सुरुवात करतात. मात्र कितीही उपाय केले तरीदेखील वजन कमी होत नाही. त्यामुळे अनेकांना वजन कसे कमी करता येईल हा प्रश्न सतावतो.

तुम्हीही वजन कमी करण्याच्या विचारात आहात मग घ्या हा काढा

पूर्वीच्या काळात, आपले आज्जी-आजोबा 100 किंवा 90 वर्ष जगायचे. दिवसभर शेतात श्रम करणे, प्राण्यांना चारा देणे इत्यादी अनेक काम उन्हात करायचे. त्यासोबतच घरातील स्त्रिया दिवसभर विविध प्रकारची कामे करायच्या. जसे की, कडक उन्हात 2-3 घागरी घेऊन घरापासून 3-4 किलोमीटर दूर नदीकाठी जाऊन पाणी आणणे किंवा विहिरीतून पाणी काढणे, तसेच संपूर्ण कुटुंबासाठी जेवण बनवणे अशा अनेक कठीण जबाबदाऱ्या आणि श्रमाची कामे न थकता पार पाडायचे. याच कारणामुळे आपले आजी-आजोबा आजही मजबूत आणि कणखर आहेत. मात्र सध्याच्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आजच्या तरुण पिढींना अनेक समस्या होत आहेत. डायबिटीस, शुगर, हृदयविकार हे वाढत्या वजनाची लक्षणे आहेत. याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. जसे की वेळेत झोप न घेणे, तणावपूर्ण जीवनशैली असणे, चुकीच्या आहारांचे सेवन करणे, इत्यादी.

हेही वाचा: Long Covid : ‘लाँग कोविड’ बाधित लहान आणि किशोरवयीन मुलांच्या फुफ्फुसांना गंभीर इजा; नवीन अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष


               त्यामुळे अनेकजण वजन कमी करण्यासाठी  जिमला जातात किंवा पौष्टिक आहार घ्यायला सुरुवात करतात. मात्र कितीही उपाय केले तरीदेखील वजन कमी होत नाही. त्यामुळे अनेकांना वजन कसे कमी करता येईल हा प्रश्न सतावतो. चला तर आपण जाणून घेऊया घरबसल्या वजन कमी करण्यासाठी कोणते घरगुती उपाय करू शकतो.  

घरगुती काढा बनवण्यासाठी

सामग्री:

अर्धा लिटर पाणी,
ओवा,
बडिशेप,
हळद, 
धणे. 

एका पातेल्यामध्ये अर्धा लिटर पाणी घ्या. मग त्यामध्ये आपल्याला 1 चमचा ओवा आणि 1 चमचा बडिशेप टाका. त्यानंतर पातेल्यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 मोठा चमचा धणे घाला. या मिश्रणांना उकळून घ्या आणि 15 मिनिटे झाकून ठेवा. या काढ्याला झोपण्यापूर्वी घ्यावे. जर तुम्ही 14 दिवस सलग या कढ्याचे सेवन केला तर लवकरच तुम्हाला फरक जाणवेल. हा उपाय पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि हा काढा तुमचे वजन करण्यास मदत करते. त्यामुळे केमिकलयुक्त आहार घेण्याऐवजी नैसर्गिक घरगुती उपाय घ्यायला सुरुवात करा. 

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री