Wednesday, August 20, 2025 09:28:20 AM

Home Decoration Tips : घराचं डेकोरेशन तर करायचंय.. पण जास्त खर्च परवडणार नाही? अशी करा आपल्या बजेटमधली सजावट

घर सजवण्यासाठी बाजारातून महागड्या वस्तू खरेदी करव्या लागतात हा गैरसमज आहे. तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही अगदी कमी बजेटमध्येही तुमचे घर सजवू शकता. आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय, या खास टिप्स..

home decoration tips  घराचं डेकोरेशन तर करायचंय पण जास्त खर्च परवडणार नाही अशी करा आपल्या बजेटमधली सजावट

Home Decoration Tips : प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की कधीतरी स्वतःचे घर असेल. बरेच लोक स्वतःचे घर बांधण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य घालवतात. तसेच, लोक त्यांचे जुने असो किंवा नवीन घर असो, ते सजवण्यासाठी खूप विचारपूर्वक वस्तू खरेदी करतात. घर सजवण्याची कला खूप महत्त्वाची आहे. म्हटलं तर हे काही जणांना थोडसं कठीण वाटू शकतं. यासाठी आधी तुम्हाला तुमचं बजेट ठरवावं लागेल. जाणून घ्या, कमी बजेटमध्ये घर कसे सजवायचे?

कमी बजेटमध्ये तुमचे घर कसे सजवायचे?
काही लोक असे असतात जे घर सजवण्यासाठी बाजारातून महागड्या वस्तू खरेदी करून त्या वस्तूंनी आपले घर सजवतात. पण, तुम्हाला माहिती आहे का की, तुम्ही अगदी कमी बजेटमध्येही तुमचे घर सजवू शकता. जर तुम्हालाही तुमचे घर सजवायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या घराचा लूक पूर्णपणे बदलू शकता.

हेही वाचा - Chanakya Niti: आचार्य चाणक्यांचा विद्यार्थ्यांसाठी गुरुमंत्र; यश हवंय ना? मग या 4 गोष्टी नक्की करा

कमी बजेटमध्ये असे सजवा घर?

घराच्या भिंतीवर पेंटिंग लावा
तुम्ही तुमच्या घराच्या भिंतींवर पेंटिंग्ज लावू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कला आणि डिझाइन निवडू शकता. कमी बजेटमध्ये तुम्हाला बाजारात चांगले पेंटिंग्ज मिळतील, जे दिसायलाही छान असतील. तुम्ही तुमच्या इंटीरियरनुसारदेखील हे पेंटिंग निवडू शकता.

कुंड्यांमध्ये फुले लावा
तुम्ही तुमच्या घरात कुंडीत लावलेली रोपे देखील ठेवू शकता. हे तुमच्या सजावटीत सौंदर्य वाढवेल. यासाठी तुम्ही काही हवा शुद्ध करणारी रोपटीदेखील निवडू शकता. यासाठी तुम्ही डिफेन, एरिका पाम, कॅलाथिया, स्नॅक प्लांट सारख्या वनस्पतींचा पर्याय म्हणून विचार करू शकता.

भिंतीवर लावलेले कपाट
तुम्ही तुमच्या घराच्या भिंतींवर आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार लहान किंवा मोठे कपाटदेखील बसवू शकता. तुम्ही यावर सजावटीच्या किंवा दगडी वस्तू देखील ठेवू शकता. येथे तुम्ही पुस्तके, वनस्पती, पुतळे किंवा इतर सजावटीच्या वस्तू देखील ठेवू शकता.

जमिनीवर कार्पेट घाला
तुम्ही तुमच्या घरात जमिनीवर कार्पेट देखील घालू शकता. कार्पेट तुमच्या घराला एक सुंदर आणि आलिशान लूक देते. जर तुमची खोली लहान असेल तर तुम्ही घट्ट विणलेल्या कार्पेटचा पर्याय म्हणून विचार करू शकता.

हेही वाचा - ओव्याची पाने आरोग्यासाठी अमृत! उन्हाळ्यात हे 3 आजार तुमच्या जवळही येणार नाहीत..


सम्बन्धित सामग्री