महाराष्ट्र राज्य त्याच्या मराठमोळ्या संस्कृतीसाठी, शिवकालीन किल्ल्यांसाठी, आणि परंपरेसाठी विशेष ओळखला जातो. महाराष्ट्रात असे अनेक ठिकाण आहे, ज्याला ऐतिहासिक महत्व आहे. त्यासोबतच अनेक महान संत, विद्वान आणि प्रसिद्ध व्यक्ती महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात तुम्हाला अनेक नयनरम्य ठिकाण पाहायला मिळेल. अनेक पर्यटक भारताच्या विविध कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रात नोकरी, व्यवसाय, शिक्षण, उद्योग करण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यासोबतच दररोज लाखोच्या संख्येने पर्यटक महाराष्ट्रात येतात. मात्र असेही काही ठिकाण आहेत जे आजही अपरिचित पण नयनरम्य ठिकाण आहेत. चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील अपरिचित पण नयनरम्य ठिकाणे.
1 - कोल्हापूर:
कोल्हापूर शहर राजश्री शाहू महाराजांच्या इतिहासासाठी, महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चप्पलसाठी, तिथल्या खाद्य - संस्कृती, कुस्तीसाठी, रांगड्या भाषेसाठी आणि त्यासोबतच माणुसकीसाठी खूप प्रसिद्ध आहे. कोल्हापूर शहरापासून थोड्याच अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले पन्हाळगड, पावनखिंड, विशाळगड प्रसिद्ध आहे.
हेही वाचा: जीवनात यशस्वी होण्यासाठी आजपासूनच करा 'हे' उपाय
2 - महाबळेश्वर:
पश्चिम घाटात असलेल्या सह्याद्री डोंगराच्या कुशीत असलेले थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरला ओळखले जाते. उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात महाबळेश्वरमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. महाबळेश्वर ठिकाण स्ट्रॉबेरी, त्यासोबतच विविध फळांच्या उत्पादनासाठी जगप्रसिद्ध आहे. महाबळेश्वरमध्ये अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहेत.
3 - मेणवली घाट:
मेणवली घाट महाराष्ट्राच्या सातारा जिल्यामध्ये असलेल्या वाईमध्ये आहे. कृष्णा नदीकाठीजवळ वाई नावाचे गाव आहे. वाईपासून ३ किलोमीटरच्या अंतरावर वसलेले मेणवली गाव आहे. या ठिकाणी अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहेत. १८ व्या शतकात नाना फडणवीस यांनी बांधलेल्या वाड्यामुळे हे गाव प्रसिद्ध झाले.
4 - बारामोटेची विहीर:
बारामोटेची विहीर त्याच्या अनोख्या वास्तुशैलीमुळे प्रसिद्ध आहे. बारामोटेची विहीर सातारा जिल्ह्यातील लिंब गावात आहे. ह्या विहिरीतून पाणी उपसण्यासाठी एकावेळी १२ मोटा लावल्या जात. तेथील लोक आजही बारामोटेची विहीरीत असलेले पाणी वापरतात. असे म्हणतात की कितीही दुष्काळ आला तरीसुद्धा येथील पाणी कधीच कमी होत नाही. या ठिकाणी छावा, सैराट, अश्या अनेक चित्रपटांचे शूटिंग झाले आहेत.
हेही वाचा: तुम्हीही वजन कमी करण्याच्या विचारात आहात? मग घ्या 'हा' काढा
5 - कुणकेश्वर मंदिर:
कुणकेश्वर हे ठिकाण कोकणातील प्रसिद्ध देवगड जिल्ह्यामध्ये वसलेले नयनरम्य ठिकाण आहे. मंदिराजवळ असलेल्या अरबी समुद्राच्या सुंदर दृश्यामुळे हे ठिकाण पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करतात.