मुंबई: जेव्हा आपण किराणा माल खरेदी करण्यासाठी एखाद्या दुकानात किंवा डी-मार्टमध्ये जातो, तेव्हा आपण पाहतो की बऱ्याच फूड पॅकेजिंगवर वेगवेगळ्या रंगाचे चिन्ह दिसतात. बहुतांश अनेकांना फक्त लाल आणि हिरव्या रंगांच्या चिन्हांबाबतच माहीत आहे. लाल म्हणजे मांसाहारी तर हिरवा म्हणजे शाकाहारी. तर आता बरेच लोकं पूर्णपणे व्हेगन झाले आहेत, म्हणजे दूध नाही, तूप नाही, अंडी नाही, तर फक्त वनस्पती संबंधित आहाराचे सेवन करतात. मात्र, जर तुम्ही निरीक्षण केले, तर या फूड पॅकेजिंगवर 5 वेगवेगळ्या रंगांचे रंगांची चिन्हे आहेत, जी थेट आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: 'ही' अभिनेत्री होती माधुरीची झेरॉक्स कॉपी; चक्क शाहरुखची फिल्म नाकारली
1. हिरवा रंग: खाद्य पॅकेटवर असलेला हिरवा रंग म्हणजे हे पदार्थ पूर्णपणे शाकाहारी आहे. यासह, या खाद्य पॅकिंगमध्ये कोणतेही प्राणीजन्य पदार्थ नाहीत.
2. लाल रंग: खाद्य पॅकेटवर असलेला लाल रंग म्हणजे हे पदार्थ पूर्णपणे मांसाहारी आहे. यात अंडी, मांस किंवा प्राणिजन्य पदार्थ असतात.
3. पिवळा रंग: खाद्य पॅकेटवर असलेला पिवळा रंग म्हणजे या खाद्य पॅकिंगमध्ये अंड्याचा वापर केल्याचे सूचित करते. विशेषत: यात प्राणिजन्य पदार्थ नसते.
4. निळा रंग: खाद्य पॅकेटवर असलेला निळा रंग म्हणजे हे उत्पादन औषधाशी संबंधित आहे. याचा अर्थ असा आहे की ते वैद्यकीय स्थितीसाठी वापरले जाऊ शकते आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये.
5. काळा रंग: जर खाद्य पॅकेटवर काळा रंग असेल तर या खाद्य पॅकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात रसायनांचा वापर करण्यात आला आहे. हे पदार्थ चव वाढवण्यासाठी, रंग टिकून राहण्यासाठी किंवा ते जास्त काळ खराब होऊ नये म्हणून जोडले जातात. मात्र, यातील अन्न तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)