Wednesday, August 20, 2025 01:25:58 PM

Mahashivratri 2025: महाशिवरात्री स्पेशल घरी बनवा पारंपारिक उपवासाचे पदार्थ

महाशिवरात्रीला अनेकांच्या घरी नवनवीन उपवासाचे पदार्थ बनवले जातात. तर चला पाहूया महाशिवरात्री विशेष तुम्ही उपवासाचे कोणते पारंपारिक पदार्थ घरच्या घरी बनवू शकता.

mahashivratri 2025 महाशिवरात्री स्पेशल घरी बनवा पारंपारिक उपवासाचे पदार्थ

महाशिवरात्रीनिमित्त अनेक शिवमंदिरात आपल्याला भाविकांची गर्दी पाहायला मिळते. अशी मान्यता आहे की या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता, ज्यामुळे महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीला अनेकांच्या घरी नवनवीन उपवासाचे पदार्थ बनवले जातात. तर चला पाहूया महाशिवरात्री विशेष तुम्ही उपवासाचे कोणते पारंपारिक पदार्थ घरच्या घरी बनवू शकता. 

हेही वाचा: Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला बनवा साबुदाणा फ्राइज, पटकन होईल तयार 

1 - साबुदाणा खिचडी:

उपवासाच्या दिवशी घरोघरी साबुदाणा खिचडी मोठ्या प्रमाणात बनवले जातात. भिजलेला साबुदाणा, शेंगदाणे, सैंधव मीठ, आणि मिरचीचे कापलेले तुकडे यांच्यापासून तुम्ही साबुदाणा खिचडी बनवू शकता. हे पदार्थ पटकन बनवले जाऊ शकते. साबुदाणा खिचडी तुम्हाला उपवासादरम्यान फ्रेश राहण्यास मदत करते. 

2 - फ्रुट सलाड:

दिवसभर ताजे आणि फ्रेश राहण्यासाठी अनेकजण फ्रुट सलाड खातात. यामध्ये व्हिटॅमिन, प्रोटीन, आणि अनेक पोषक तत्व आहे ज्याचे अनेक फायदेदेखील तुम्हाला अनुभवायला मिळेल. यामध्ये केळी, सफरचंद, दूध, डाळिंब एकत्र करून खाऊ शकता. 

हेही वाचा: उपवासासाठी परफेक्ट साबुदाणा खीर! या 5 सोप्या टिप्सने बनवा स्वादिष्ट आणि मलाईदार खीर

3 - लस्सी:

लस्सी थंड पेय असून दहीपासून तयार होते. लस्सी पेय भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पीले जातात. लस्सी पिण्याचे अनेक फायदे आहेत. लस्सीमध्ये अनेक गुणकारी सत्व आहेत ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश आणि ताजे राहता. लस्सी पिल्याने पाचनशक्तीदेखील सुरळीत होते. 

4 - मखाने:

उपवासासाठी अनेकजण मखानेदेखील मोठ्या प्रमाणात खातात. मखाने उपवासासाठी सर्वोत्तम म्हटले जाते. याचे कारण म्हणजे मखान्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते आणि यामध्ये कॅलरीदेखील कमी असते. 


सम्बन्धित सामग्री