Wednesday, August 20, 2025 04:36:26 AM

कोल्हापुरात स्टंट करणाऱ्या कारने विद्यार्थिनींना चिरडलं; एका विद्यार्थीनीचा मृत्यू, 3 जखमी

अपघातानंतर आरोपी अल्पवयीन मुलांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

कोल्हापुरात स्टंट करणाऱ्या कारने विद्यार्थिनींना चिरडलं एका विद्यार्थीनीचा मृत्यू 3 जखमी
Accident प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

राधानगरी: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात गुरुवारी एक भीषण अपघात घडला. भोगावती महाविद्यालयाजवळ, भरधाव कारने बस स्टॉपवर उभ्या असलेल्या विद्यार्थिनींना धडक दिली. या दुर्घटनेत 18 वर्षीय प्रज्ञा कांबळे हिचा जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातात तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. सध्या जखमी विद्यार्थीनींवर रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

हेही वाचा -गोविंदांसाठी सरकारची मोठी घोषणा! 10 लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळणार

कार चालवणारे अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात - 

या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर आरोपी अल्पवयीन मुलांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघातास कारणीभूत असलेली कार (MH09 BB 5907) जप्त करण्यात आली आहे. तसेच दोघा अल्पवयीन मुलांना अटक करण्यात आली आहे. 

हेही वाचा - रशियामध्ये 50 प्रवाशांना घेऊन जाणारे अंगारा एअरलाइन्सचे विमान कोसळले

कार चालकावर गुन्हा दाखल - 

तथापी, वाहन मालक आणि अल्पवयीन मुलाच्या पालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत प्रज्ञा कांबळे ही एक अभ्यासू विद्यार्थिनी होती. तिच्या अकाली निधनाने कुटुंबीय आणि तिच्या वर्गमैत्रिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भोगावती महाविद्यालयाने आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या अपघातामुळे राज्यात अल्पवयीन वाहनचालकांचा वाढता धोका आणि पालकांची निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री