Thursday, August 21, 2025 02:53:22 AM

अश्विनी देशमुखांना नोकरीचा प्रस्ताव

रमेश आडसकरांच्या संस्थेत लिपिक पदाच्या नोकरीचा प्रस्ताव अश्विनी देशमुखांना देण्यात आलाय. अश्विनी देशमुख यांना नियुक्तीपत्र देखील प्रदान प्रदान करण्यात आलंय.

अश्विनी देशमुखांना नोकरीचा प्रस्ताव

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळाले. काही महिन्यांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. खंडणी प्रकरणामुळे ही हत्या झाल्याची चर्चा सर्वत्र असून यावर अनेक राजकीय पडसाद देखील पाहायला मिळाले. एवढंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरात सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणी देशमुख कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून अनेक मूक मोर्चे काढण्यात आले.

हेही वाचा: अभ्यासक्रमात क्रिकेटचा समावेश होणार

देशमुख कुटुंब देखील न्यायासाठी दाद मागत राहील. मृत सरपंच संतोष देशमुख यांची लेक यंदा बारावीला होती. काही दिवसांपूर्वीच बारावीचे पेपर सुरु झालेत. अशातच वडिलांच्या मृत्यूचा दुःखाचा मोठा डोंगर बाजूला सारून देशमुखांच्या लेकीने म्हणजे वैभवी देशमुखने बारावीचा पेपर लिहला. 

यातच आता मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीला नोकरीचा प्रस्ताव देण्यात आलाय. अश्विनी संतोष देशमुख असं मृत सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नीचं नाव असून त्यांना नोकरीचा प्रस्ताव देण्यात आलाय. रमेश आडसकरांच्या संस्थेत लिपिक पदाच्या नोकरीचा प्रस्ताव अश्विनी देशमुखांना देण्यात आलाय. अश्विनी देशमुख यांना नियुक्तीपत्र देखील प्रदान प्रदान करण्यात आलंय. दरम्यान आता अश्विनी देशमुख ही नोकरी स्वीकारणार की नाही हे पाहून महत्वाचं ठरणार असून देशमुख कुटुंब याबाबत निर्णय घेणारे. 


सम्बन्धित सामग्री