Wednesday, August 20, 2025 01:26:50 PM

स्फोटाचा कट उघड! हातात जिलेटिनच्या कांड्या आणि सिगारेट, बीडच्या मशिदीत स्फोट घडवण्यापूर्वी आरोपीनं बनवली रील

रमजानच्या महिन्यात पहाटे 3;30 वाजण्याच्या सुमारास मशिदीत भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे मशिदीचा काही भाग जमीनदोस्त झाला असून फरशी तुटून पडली.

स्फोटाचा कट उघड  हातात जिलेटिनच्या कांड्या आणि सिगारेट बीडच्या मशिदीत स्फोट घडवण्यापूर्वी आरोपीनं बनवली रील

बीड: गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात मशिदीत झालेल्या स्फोटाने जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. विशेष म्हणजे, या स्फोटाचा आरोपी विजय गव्हाणे याने स्फोट घडवण्यापूर्वी हातात जिलेटिनच्या कांड्या आणि सिगारेट घेत इंस्टाग्रामवर रील बनवली होती. या धक्कादायक घटनेनंतर पोलिसांनी गव्हाणे आणि श्रीराम सागडे या दोघांना ताब्यात घेतले आहे. 

नेमकं काय घडलं?
रमजानच्या महिन्यात पहाटे 3;30 वाजण्याच्या सुमारास मशिदीत भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे मशिदीचा काही भाग जमीनदोस्त झाला असून फरशी तुटून पडली. सुदैवाने जीवितहानी टळली, पण संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनेची माहिती मिळताच विशेष पोलिस महानिरीक्षक (संभाजीनगर परिक्षेत्र) वीरेंद्र मिश्र यांच्यासह पोलिसांचे पथक, बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. तपासाच्या प्राथमिक अहवालानुसार, हा स्फोट पूर्वनियोजित असून त्यामागे मोठा कट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: बीडमध्ये ईद सणाला गालबोट, मशिदीत भीषण स्फोट, परिसरात खळबळ

आरोपी विजय गव्हाणे याने स्फोटाच्या काही तास आधी हातात जिलेटिनच्या कांड्या आणि सिगारेट घेऊन इंस्टाग्रामवर रील बनवली होती. हा प्रकार सोशल मीडियावर समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या घटनेनंतर बीड जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. रमजानच्या काळात अशी घटना घडल्याने प्रशासनाने नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान, तपास अधिक वेगाने सुरू असून आणखी कोणी या कटात सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे.


सम्बन्धित सामग्री