Wednesday, August 20, 2025 04:30:11 AM

Mahadevi Elephant Kolhapur: सरकार संपूर्ण ताकद लावणार, महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सरसावले

माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की, 'राज्य सरकार पूर्ण ताकदीने कोल्हापुरातील नांदणी मठासोबत आहे'.

mahadevi elephant kolhapur सरकार संपूर्ण ताकद लावणार महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सरसावले

कोल्हापूर: 29 जुलै रोजी शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन मठातील हत्तीणी माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला गुजरातमधील अंबानींच्या 'वनतारा' येथे पाठवण्यात आले. यामुळे, कोल्हापुरकर आक्रमक असून माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींच्या नेतृत्वात 3 ऑगस्ट रोजी नांदणी ते कोल्हापूर आत्मक्लेष पदयात्रा काढण्यात आली होती. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की, 'राज्य सरकार पूर्ण ताकदीने कोल्हापुरातील नांदणी मठासोबत आहे'. 

काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

'राज्य सरकार पूर्ण ताकदीने कोल्हापुरातील नांदणी मठासोबत आहे. इतकच नाही, तर महादेवी हत्तीणीची निगा राखण्यासाठी आणि तिची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करण्यात येईल. यासह, कोल्हापुरातील नांदणी मठाने महादेवी हत्तीणीला परत आणण्याबाबत एक याचिका दाखल करावी. तसेच, सरकारही एक याचिका दाखल करणार आहे. कोल्हापुरातील नांदणी मठात महादेवी हत्तीण परत आली पाहिजे, ही सर्वांची इच्छा आहे', अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. 


 


सम्बन्धित सामग्री