पिंपरी चिंचवड : तुकाराम बीज सोहळ्यासाठी देहूनगरी सज्ज झाली आहे. यासाठी देहू नगरपंचायतीकडून नियोजन बैठक घेण्यात आली आहे. तुकाराम बीज सोहळ्याच्या अनुषंगाने बैठकीत भाविकांच्या सोयी-सुविधांवर चर्चा करण्यात आली.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या अनुषंगाने नियोजन आणि सोहळ्यापूर्वी नगरपंचायत सज्ज झाली आहे. देहूत रुग्णवाहिका सेवाभावी संस्थेला अनामत रकमेद्वारे देणे, पथविक्रेत्यांकडून दैनंदिन व्यावसायिक कर आकारणे या विषयांवर देहू नगरपंचायत कार्यालयांमध्ये निर्णय घेण्यात आला. देहू नगरपंचायत सभागृहामध्ये नगराध्यक्ष पूजा दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष सभा घेण्यात आली. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. त्या अनुषंगाने भाविकांच्या सोयीसुविधा आणि जागोजागी सीसीटीव्ही लावणे, इंद्रायणी घाटाची स्वच्छता करण्याची चर्चा देखील या विशेष सभेमध्ये करण्यात आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठीचा देखील निर्णय या विशेष सभेत घेण्यात आला.
हेही वाचा : पुण्यातील शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरण : आरोपी दत्तात्रय गाडेची होणार डीएनए चाचणी
देहूनगरीमध्ये तुकाराम महाराज बीज सोहळ्यासाठी विशेष तयारी केली जात आहे. यासाठी नगरपंचायत सभागृहामध्ये विशेष सभा घेण्यात आली. या सभेमध्ये तुकाराम बीज सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी विशेष नियोजन करण्यात आले. भाविकांच्या सोयीसुविधांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. भाविकांसाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यावरही सभेत चर्चा झाली. बैठकीत स्वच्छतेवरही चर्चा करण्यात आली.