Monday, September 01, 2025 07:12:11 PM

एकनाथ शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार उपस्थित; चर्चांना उधाण

‘ऑपरेशन टायगर’चा प्रभाव? ठाकरे गटाच्या खासदाराच्या उपस्थितीवर राजकीय उलथापालथ

एकनाथ शिंदेंच्या सत्कार कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार उपस्थित चर्चांना उधाण

दिल्लीतील महाराष्ट्र सदन सभागृहात मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामुळे ठाकरे गटामध्ये तीव्र नाराजी दिसून आली, कारण शिवसेना फुटीसाठी जबाबदार असलेल्या एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाल्याने संजय राऊत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. मात्र, याच कार्यक्रमाला ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते, यावरून मनसेने संजय राऊतांना सवाल केला आहे. "यावर ते काही बोलणार का?"

एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यावर ठाकरे गटाने टीका केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने शरद पवारांची बाजू घेतली. मात्र, संजय दिना पाटील यांची या कार्यक्रमाला उपस्थिती ठाकरे गटासाठी धक्कादायक ठरत आहे.

सोहळ्याचे निमंत्रण असल्याने हजेरी – संजय दिना पाटील
संजय दिना पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांची शरद पवारांशी जवळीक आहे. त्यामुळेच ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खुद्द संजय दिना पाटील यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, “महाराष्ट्र राज्याचा अधिकृत कार्यक्रम असल्याने मी तिथे गेलो होतो. सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मला निमंत्रण मिळाले होते, त्यामुळे मी तिथे हजेरी लावली.”

शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ सुरूच!
ठाकरेंच्या गटातील काही आमदार आणि खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कालच रत्नागिरीतील माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती आणि आज ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशातच संजय दिना पाटील यांच्या उपस्थितीमुळे ठाकरे गटात आणखी खळबळ उडाली आहे.

"काही जण प्रकाशात आले, काही अजून नाहीत" – उदय सामंत
मंत्री उदय सामंत यांनी यावर सूचक विधान करताना सांगितले, “काही जण आता प्रकाशात आले आहेत, काही अजून यायचे आहेत.” त्यामुळे ठाकरे गटातील आणखी काही नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

👉👉 हे देखील वाचा : राजन साळवींचा मोठा निर्णय : शिवसेनामध्ये प्रवेश, उद्धव सेनेला धक्का!

सम्बन्धित सामग्री