Saturday, September 06, 2025 02:46:34 AM

First Tesla Delivered in Mumbai: मुंबईत पहिल्या टेस्ला कारची डिलिव्हरी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठरले पहिले ग्राहक

भारतात आज पहिली टेस्ला कार वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील 'टेस्ला एक्सपिरीयन्स सेंटर' मधून देण्यात आली. ही कार घेणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पहिले भारतीय बनले आहेत.

first tesla delivered in mumbai मुंबईत पहिल्या टेस्ला कारची डिलिव्हरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठरले पहिले ग्राहक

First Tesla Delivered in Mumbai: टेस्ला मॉडेल वायची पहिली डिलिव्हरी आज, 5 सप्टेंबर रोजी आर्थिक राजधानी मुंबईत झाली आहे. भारतात आज पहिली टेस्ला कार वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील 'टेस्ला एक्सपिरीयन्स सेंटर' मधून देण्यात आली. ही कार घेणारे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे पहिले भारतीय बनले आहेत. या इलेक्ट्रिक कारच्या चाव्या शोरूममध्ये प्रताप सरनाईक यांना देण्यात आल्या. मुंबईतील भारतातील पहिल्या 'टेस्ला एक्सपिरीयन्स सेंटर'चे उद्घाटन या वर्षी 15 जुलै रोजी झाले होते. आज येथे टेस्ला कारची डिलिव्हरी करण्यात आली आहे.

प्रताप सरनाईक बनले पहिल्या टेस्ला कारचे मालक  

वाहतूक मंत्री आणि भारतातील पहिल्या टेस्ला कारचे मालक प्रताप सरनाईक यांनी या खास प्रसंगी सांगितले की, 'मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला भारतातील पहिली टेस्ला कार, मॉडेल वाय खरेदी करण्याची संधी मिळाली. राज्याचे परिवहन मंत्री म्हणून मी ती खरेदी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात मी यशस्वी झालो. महाराष्ट्र सरकार नेहमीच पर्यावरणपूरक कार रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करते.' 

इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न

वाढत्या प्रदूषणाबद्दल बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, पर्यावरणपूरक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी मी जनजागृती करू इच्छितो. पुढील 10 वर्षांत रस्त्यावर जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहने आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रिक वाहने बनवणाऱ्या कंपन्यांना सर्व सुविधा देण्याचा परिवहन विभाग प्रयत्न करतो, आम्ही अशा वाहनांच्या मालकांनाही सुविधा दिल्या आहेत.

हेही वाचा - Western Railway Jumbo Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' रेल्वे मार्गावर होणार जम्बो ब्लॉक

मॉडेल Y चे खास वैशिष्ट्ये

किंमत: 60 लाख रुपये (रीअर-व्हील ड्राइव्ह), ₹68 लाख (लाँग रेंज रीअर-व्हील ड्राइव्ह)
रेंज: 622 किलोमीटर (लाँग रेंज व्हर्जन)
वेग: 0 ते 100 किमी/ताशी फक्त 5.6 सेकंदात
सुपरचार्जिंग: 15 मिनिटांत 267 किलोमीटरची रेंज
पर्याय: 6 रंग, पांढरे व काळे इंटीरियर
अतिरिक्त 6 लाखांत FSD (फुल सेल्फ-ड्रायव्हिंग) पॅकेज

हेही वाचा - Bomb Threat: '34 वाहनांमध्ये 400 किलो RDX...'; वाहतूक पोलिसांना धमकी, मुंबईत हाय अलर्ट जारी

दरम्यान, टेस्लाने दिल्लीतील दुसरे एक्सपिरीयन्स सेंटर 11 ऑगस्ट रोजी सुरू केले. लवकरच दिल्ली, गुरुग्राम, मुंबई आणि पुण्यात मॉडेल Y ची डिलिव्हरी सुरू होणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. टेस्ला मॉडेल Y सध्या भारतीय बाजारात कंपनीचे एकमेव मॉडेल असून इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात हा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे. 


सम्बन्धित सामग्री