Wednesday, August 20, 2025 05:16:50 AM

उद्या देशभरात जनतेचा ‘युद्धसराव’, आपत्कालीन स्थितीत काय कराल? संरक्षण तज्ज्ञांनी दिल्या 'या' सुचना

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिलचे आदेश दिले आहेत. युद्धजन्य स्थितीत नागरिकांची व यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी ही पूर्वतयारी आहे.

उद्या देशभरात जनतेचा ‘युद्धसराव’ आपत्कालीन स्थितीत काय कराल संरक्षण तज्ज्ञांनी दिल्या या सुचना

नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने 7 मे रोजी देशभरात मॉक ड्रिलचे आदेश दिले आहेत. युद्धजन्य स्थितीत नागरिकांची व यंत्रणांची तयारी तपासण्यासाठी ही पूर्वतयारी असून, संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या काही महत्वाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करत केंद्र सरकारने देशात युद्धजन्य परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन महत्वाचा निर्णय घेतला आहे.

 "मॉक ड्रिल" (Mock Drill)  म्हणजेच युद्धस्थितीत नागरिकांनी आणि प्रशासन यंत्रणांनी कोणती कृती करावी याचा सराव करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामागे युद्धकाळातील आपत्कालीन तयारी तपासणे आणि नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

हेही वाचा: भारत - पाकिस्तान तणावानंतर गृहमंत्रायलाचे निर्देश; 7 मे रोजी देशव्यापी 'मॉक ड्रिल'


आपत्कालीन स्थितीत काय कराल? 

सायरन वाजताच सतर्क व्हा: हल्ल्याचा धोका लक्षात येताच सायरन वाजवला जाईल. आवाज ऐकून त्वरित सतर्क व्हा.
सुरक्षित निवाऱ्यात जा सायरन वाजताच जवळच्या बंकर, तहान शिबीर किंवा निर्धारित निवाऱ्याकडे धावा.
इमारतीतून बाहेर पडा: जर तुम्ही उंच इमारतीत असाल, तर ती कोसळण्याची शक्यता असते. शक्य तितक्या लवकर बाहेर पडा.
भिंतींचा आसरा घ्या: जर उघड्यावर असाल तर मजबुत भिंतींच्या आड लपवा. त्यामुळे आघात टळू शकतो.
रात्री प्रकाश बंद ठेवा: रात्रीच्या वेळी शत्रू विमानांना लक्ष्य सापडू नये म्हणून घरातील लाईट्स पूर्णपणे बंद ठेवा.
इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद करा: स्फोटाचा धोका टाळण्यासाठी त्वरित टीव्ही, रेडिओ, गॅस, मोबाईल चार्जर बंद करा.

हेही वाचा: उद्या देशभरात 'मॉक ड्रिल'; मुंबईत एअर रेडचा सायरन


राज्यांना दिलेले 'युद्धपूर्व तयारीचे' निर्देश

हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन वाजवा.
नागरिक व विद्यार्थी यांना स्व-संरक्षणाचे प्रशिक्षण द्या.
एकाचवेळी अंधार करण्याची यंत्रणा तयार ठेवा.
महत्त्वाच्या इमारतींची सुरक्षितता तपासा.
हल्ला झाल्यास नागरिक कुठे व कसे हलवायचे याचे नियोजन ठेवा.

कशी असेल 'मॉक ड्रिल'? घाबरू नका, तयार राहा!

अचानक भोंगा वाजेल. 
तुम्हाला हातातले काम सोडून मोकळ्या जागेत जावं लागेल. 
एखाद्या सार्वजनिक ठिकाणी अचानक पोलीस दलाची धावपळ सुरु होईल. 
आग विझवण्याची धावपळ अचानक सुरु होईल. 
अतिरेक्यांप्रमाणे काही माणसं अचानक धावताना दिसतील. 
काहीकाळ वीज, पाणी पुरवठा अचानक बंद होऊ शकतो. 

मॉक ड्रिल आवश्यक का असतं? 

मॉक ड्रिल (Mock Drill) आवश्यक असते कारण ती आपत्ती व्यवस्थापनाची तयारी तपासण्यासाठी आणि सुधारणेसाठी एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असते. 

1. आपत्तीच्या वेळी प्रतिक्रिया तपासण्यासाठी: आपत्तीच्या वेळी नागरिक, कर्मचारी किंवा विद्यार्थी कसे प्रतिसाद देतील, हे समजण्यासाठी मॉक ड्रिल घेतली जाते.
2. सुरक्षेच्या उपायांची चाचणी: सुरक्षित मार्ग, आपत्कालीन दरवाजे, अलार्म सिस्टम, इमारतीची संरचना या सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत का, हे मॉक ड्रिलमुळे लक्षात येते.
3. जनजागृती व प्रशिक्षण: नागरिकांना योग्य पद्धतीने आपत्ती काळात वागण्याचे प्रशिक्षण मिळते. घबराट न करता संयमाने कसे वागावे, याची सवय लागते.
4. जबाबदाऱ्या निश्चित करणे: प्रत्येक कर्मचाऱ्याची किंवा संस्थेतील व्यक्तींची भूमिका ठरवली जाते, जेणेकरून खर्‍या प्रसंगी गोंधळ होणार नाही.
5. कमजोर दुवे शोधणे व सुधारणा करणे: प्रत्यक्ष संकट येण्यापूर्वी काय अडचणी येऊ शकतात, याचा अंदाज घेऊन त्या सुधारता येतात.

ही मॉक ड्रिल ही फक्त सराव आहे, पण ती गांभीर्याने घेणं अत्यावश्यक आहे. अतिरेक्यांचा धोका, आंतरराष्ट्रीय तणाव यापासून नागरिकांचे संरक्षण हे सरकारचं उद्दिष्ट आहे. 
 


सम्बन्धित सामग्री