जागतिक स्तरावर सर्वात मोठी खतांची सहकारी संस्था असलेल्या IFFCO ने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्याची उत्पादने विक्री करण्यास बंदी घातली आहे. IFFCO ने याआधीच लेखी स्वरूपात स्पष्ट केले आहे की कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला त्यांच्या उत्पादने विकण्याचा अधिकार नाही. अनधिकृत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून खरेदी केलेली IFFCO ची उत्पादने पूर्णपणे खरेदीदारांच्या जबाबदारीवर आहेत, कारण त्या प्लॅटफॉर्मवर ही उत्पादने अनधिकृतपणे, उच्च किमतीत विकली जातात.
IFFCO च्या ऑनलाईन विक्रीसंबंधी केंद्र सरकारच्या नियमानुसार "परवाना" किंवा IFFCO कडून अनिवार्य असलेला 'ओ फॉर्म' नसलेल्या कोणत्याही संस्थेला त्यांची उत्पादने विक्री करण्यास मनाई आहे. असं केल्यास IFFCO ने कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. IFFCO ने याबाबत वेळोवेळी प्रेस नोट काढून माध्यमांना देखील माहिती दिली आहे.
हेही वाचा: Shivsena : शिवसेनेचे सर्व खासदार प्रयागराजला जाणार
IFFCO कंपनीच्या सर्व उत्पादनांची विक्री किंमत देशभर एकसारखी आहे. मात्र काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर या खतांच्या बॅटल्यांचे विक्रीमध्ये अनधिकृत डिस्काउंट देऊन त्यांची ऑनलाईन विक्री केली जात आहे. अशा प्रकारच्या अनधिकृत विक्रीबाबत IFFCO ने संबंधितांना नोटिसा दिल्या आहेत.
अंजली दमानिया यांनी "ऍग्री बीग्री" या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून IFFCO ची उत्पादने विक्री करण्याची परवानगी नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर विक्री करण्याऐवजी संबंधित कंपनीने त्यांची विक्री बंद केली असावी. अंजली दमानिया यांना ही साधी गोष्ट समजायला हवी की, अशी विक्री व्यक्तींच्या सांगण्यावरून बंद होत नाही.
यापूर्वी, IFFCO ने 'ऍग्री बीग्री' या प्लॅटफॉर्मवर विक्री बंद केली होती. त्यामुळे दमानिया यांनी याबाबत योग्य माहिती घेतल्यावरच आरोप करायला हवे. मात्र, बीड घटनेपासून अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक खोटे आरोप केले आहेत. त्यांनी ऐकीव आणि अर्धवट माहितीच्या आधारावर सनसनी निर्माण केली आहे. राख वाहतूक, ऑफिस ऑफ प्रॉफिट, कृषी खात्यातील खरेदी प्रक्रिया आणि तीन आरोपींच्या मृतदेहाबाबत केलेले खोटे आरोप यासोबतच अर्धवट कागदपत्रांचा वापर करून जनतेला दिशाभूल केली आहे. सर्वांनाच हे लक्षात ठेवावे लागेल की IFFCO ने कोणत्याही अनधिकृत ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर त्यांची उत्पादने विक्री करण्यास बंदी घातली आहे आणि या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.