Wednesday, August 20, 2025 04:34:24 AM

नांदणीची 'महादेवी' हत्तीण अंबानींच्या 'वनतारा'कडे रवाना; गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील हत्तीणी माधुरी उर्फ महादेवी, तिला सोमवारी रात्री गुजरातमधील अंबानींच्या 'वंतारा' येथे पाठवण्यात आले.

नांदणीची महादेवी हत्तीण अंबानींच्या वनताराकडे रवाना गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

कोल्हापूर: शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टारक संस्थान मठातील हत्तीणी माधुरी उर्फ महादेवी, जिचे गेल्या 35 वर्षांपासून ग्रामस्थांशी जिव्हाळ्याचे नाते आहे, तिला सोमवारी रात्री गुजरातमधील अंबानींच्या 'वंतारा' येथे पाठवण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत आणि मठाची याचिका फेटाळून लावत, हत्तीणीशी भावनिक नाते जोडलेल्या नांदणी पंचक्रोशीतील सर्वधर्मीय नागरिकांना आपल्या साश्रूपूर्ण डोळ्यांनी निरोप दिला. या दरम्यान, ग्रामस्थांच्या उपस्थितीत नांदणी गावातील मुख्य मार्गावरून हत्तीणीची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात काढून तिला गुजरातकडे रवाना केले. यावेळी, माधुरीला उर्फ महादेवीला निरोप देण्यासाठी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. 

हेही वाचा: इथून पुढे एकही चूक... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्र्यांना खडसावलं

मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांपूर्वी हत्तीणीला गुजरात येथील वनतारा अभयारण्यात दोन आठवड्यांच्या आत पाठवण्याचा निर्णय दिला होता. यानंतर, वनतारा राधे कृष्ण मंदिर हत्ती कल्याण ट्रस्टच्या विशेष हत्ती कल्याण केंद्राचे पथक नांगणी गावात आले होते. मात्र, 'कोणत्याही परिस्थितीत हत्तीणीला जाऊ देणार नाही', असा पवित्रा घेत गावकऱ्यांनी गावव्यापी निषेध आणि मूक मोर्चा काढून आपला विरोध जाहीर केला होता.


सम्बन्धित सामग्री