Wednesday, August 20, 2025 09:16:04 AM

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला बनवा बटाट्यापासून चटपटीत पदार्थ

महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक खास सण आहे. पुरानात असे म्हटले जाते कि महाशिवरात्री दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. जो महाशिवरात्री दिवशी शंकराची मनापासून पूजा अर्चा करतो.

mahashivratri 2025 महाशिवरात्रीला बनवा बटाट्यापासून चटपटीत पदार्थ

महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक खास सण आहे. पुरानात असे म्हटले जाते कि महाशिवरात्री दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. जो महाशिवरात्री दिवशी शंकराची मनापासून पूजा अर्चा करतो. त्याची इच्छा पूर्ण होते असे मानले जाते. महाशिवरात्रीचा उत्सव इतर सणांपेक्षा वेगळा आहे. महाशिवरात्री हा उपवासाचा महत्त्वाचा सण आहे. या दिवशी उपवासासाठी अनेक पदार्थ तयार केले जातात, त्यात बटाट्याचे पदार्थ अत्यंत लोकप्रिय असतात. जाऊन घेऊयात उपवासासाठी बटाट्यापासून बनणारे चविष्ट पदार्थ. 

1. बटाट्याचा कीस
साहित्य:
२ मध्यम बटाटे
२ चमचे शेंगदाणा कूट
१ हिरवी मिरची (चिरलेली)
१ चमचा साखर
मीठ चवीनुसार
तूप

कृती:
१. बटाटे सोलून किसून घ्या.
२. तव्यावर तूप गरम करून त्यात हिरवी मिरची परतून घ्या.
३. त्यात किसलेला बटाटा घालून ५ मिनिटे परता.
४. नंतर शेंगदाणा कूट, साखर आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
५. गरमागरम बटाट्याचा कीस उपवासासाठी तयार!

हेही वाचा:  शिंदेंना घेरण्यासाठी ठाण्यात जनता दरबार?

2. बटाट्याचे उपवासाचे पराठे
साहित्य:

२ बटाटे (उकडून कुस्करलेले)
१ कप राजगिरा पीठ
१ चमचा जिरे
मीठ चवीनुसार
२ चमचे कोथिंबीर
तूप

कृती:
१. बटाटे कुस्करून त्यात जिरे, मीठ, कोथिंबीर व राजगिरा पीठ मिसळा.
2. थोडेसे पाणी घालून मळून घ्या.
3. लाटून तव्यावर तूप घालून भाजून घ्या.
4. दही किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करा.

3. बटाट्याचे फुलपाखरू (चिप्स)
साहित्य:

२ मोठे बटाटे
मीठ
तूप

कृती:
१. बटाटे पातळ चकत्या करून थोडा वेळ पाण्यात ठेवा.
२. पाणी काढून तळून कुरकुरीत करा.
३. मीठ भुरभुरवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

4. उपवासाचे बटाटेवडे
साहित्य:

२ बटाटे (उकडलेले)
१ चमचा शेंगदाणा कूट
१ चमचा जिरे पूड
हिरवी मिरची, मीठ
राजगिरा पीठ
तूप

कृती:
१. बटाटे कुस्करून त्यात शेंगदाणा कूट, जिरे पूड, मीठ आणि मिरची घाला.
२. लहान चेंडू करून राजगिरा पिठात बुडवून तळा.
३. दह्यासोबत सर्व्ह करा.

5. बटाट्याची उपवासाची भाजी
साहित्य:

२ उकडलेले बटाटे
१ चमचा शेंगदाणा कूट
१ चमचा जिरे
हिरवी मिरची
तूप, मीठ

कृती:
१. तव्यावर तूप गरम करून जिरे आणि मिरची परतून घ्या.
२. बटाटे चिरून घालून ५ मिनिटे परता.
३. शेंगदाणा कूट आणि मीठ घालून हलवून घ्या.

6. बटाट्याचे हलवा
साहित्य:

२ बटाटे
१ कप दूध
२ चमचे साखर
वेलदोडे पूड
तूप

कृती:
१. उकडलेले बटाटे कुस्करून तुपात परता.
२. दूध आणि साखर घालून ५ मिनिटे शिजवा.
३. वेलदोडे पूड घालून हलवा तयार.

7. बटाट्याचे पापड
साहित्य:

२ बटाटे
मीठ
जिरे

कृती:
१. बटाटे उकडून मॅश करा.
२. त्यात मीठ आणि जिरे घालून मिश्रण तयार करा.
३. छोटे गोळे करून उन्हात वाळवा.
४. तळून कुरकुरीत पापड तयार!

ही सर्व रेसिपी महाशिवरात्री उपवासासाठी पौष्टिक आणि चवदार आहेत. 
 


सम्बन्धित सामग्री