Vasai Streets Turn White: गेल्या आठवड्यापासून मुंबईत सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच आता एका दुर्मिळ घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वसईतील एका दुध डेअरीतील संपूर्ण दूध पूराच्या पाण्यात सांडल्याने परिसरातील रस्ते पूर्णपणे पांढरे झाले. मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने हे असामान्य दृश्य तयार झाले. रस्ते अक्षरशः दुधाच्या नदीसारखे दिसू लागल्याने स्थानिक नागरिक आश्चर्यचकित झाले. या आठवड्याच्या सुरुवातीला मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
हेही वाचा - Sanjay Raut : 'रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहतील का?'; राऊतांचा मोदी सरकारला सवाल
अशा परिस्थितीत वसईतील या दृश्याने स्थानिक नागरिक आश्चर्यचकित झाले. अनेकांनी या दृश्याचे फोटोज आणि व्हिडिओज आपल्या मोबाईलमध्ये शूट केले. सध्या सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओज प्रचंड व्हायरल झाले आहेत. दरम्यान, @unexplored_vasai आणि @nalasoparamerijaan_ या इंस्टाग्राम अकाउंट्सवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा - Mumbai Shocker: LTT कुशीनगर एक्सप्रेसच्या शौचालयात आढळला 5 वर्षांच्या मुलीचा मृतदेह; हत्येचा संशय
नायगावमध्ये प्राण्यांच्या निवाऱ्याला मोठा फटका
दरम्यान, मुंबईतील पावसाशी संबंधित आणखी एका दुर्दैवी घटनेत, 19 ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे वसईच्या नायगाव भागातील प्राण्यांच्या निवाऱ्यावर मोठा परिणाम झाला. प्राणी बचावकर्ता जीत भट्टी यांच्या जेजे फोस्टर होम व वॅगिंग हार्ट्स फाउंडेशन या आश्रयस्थानांमध्ये राहणाऱ्या प्राण्यांना मोठा फटका बसला. पुरामुळे दोन कुत्रे आणि तीन मांजरींचा मृत्यू झाला. या निवाऱ्यात सुमारे 28 कुत्रे आणि 63 मांजरी होत्या.