Wednesday, August 20, 2025 04:32:12 AM

नागपुरात मनसे कार्यकर्त्यांचा येस बँकेत गोंधळ; अधिकाऱ्याला केली मारहाण

मनसे कार्यकर्त्यांनी नागपूरच्या माउंट रोडवरील येस बँकेत घुसून एका बँक अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

नागपुरात मनसे कार्यकर्त्यांचा येस बँकेत गोंधळ अधिकाऱ्याला केली मारहाण
MNS workers beaten up Yes Bank Officer
Edited Image

नागपूर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अनेकदा आक्रमक भूमिका घेताना दिसतात. मनसे कार्यकर्त्यांनी नागपूरच्या माउंट रोडवरील येस बँकेत घुसून एका बँक अधिकाऱ्याला मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

नागपूरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. कार्यकर्त्यांनी बँक कर्मचाऱ्याला चापट मारली. तसेच बँकेच्या भिंतींवर 'येस बँक भ्रष्ट, महाराष्ट्रविरोधी' अशा घोषणा लिहिल्या. गोंधळानंतर पोलिसांनी काही मनसे अधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा - Nashik Crime News: मद्यपान करण्यास पैसे न दिल्याने स्वत:चे घर पेटविले

येस बँकेने एका जेसीबी धारकाला कर्ज दिले होते, पण हप्ते थकीत असल्याने बँकेने कारवाई केली. या कारवाईच्या निषेधार्थ, नागपूरमधील माउंट रोडवरील येस बँकेच्या शाखेबाहेर निदर्शने करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा कर्जदार आरटीओ पासिंगसाठी गेला तेव्हा बँकेने त्याचा जेसीबी जप्त केला आणि कोणतीही माहिती न देता तो विकला. कर्जदाराच्या म्हणण्यानुसार, बँकेने याबाबत त्याला कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई केली. 

मनसे कार्यकर्त्यांची येस बँकेच्या अधिकाऱ्याला मारहाण, पहा व्हिडिओ - 

हेही वाचा - भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांना हायकोर्टाचा झटका; उल्हासनगर गोळीबार प्रकरणात जामीन नामंजूर

इंद्रजित मुळे यांनी अनेक वेळा बँकेत जाऊन न्याय मागितला, मात्र प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर त्यांनी मनसेकडे मदत मागितली. यानंतर मनसेने येस बँकेविरोधात आंदोलन छेडले आणि बँकेत थेट घुसून ही कारवाई केली. या संपूर्ण घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
 


सम्बन्धित सामग्री