नागपूर: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरात राडा झाल्याचं देखील पाहायला मिळालं होत. त्यानंतर नागपूरमध्ये संचारबंदी झाल्याचं पाहायला मिळालं होत. त्यात आता नागपूरमधील संचारबंदी हटवली आहे. नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता नागपूरमधील संचारबंदी हटवली आहे. ही संचारबंदी हटवल्यानंतर नागपूर पोलिसांनी संबंधित परिसरात रूटमार्च काढल्याचं देखील समोर आलंय.
हेही वाचा:शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? काय म्हणाले छगन भुजबळ?
कोणत्या भागात काढला रूटमार्च?
गणेशपेठ, कोतवाली , तहसील आणि यशोधरा नगर या भागात संचारबंदी उठवताच बाजापेठा उघडायला सुरवात झाली. त्यामुळे व्यापारी, दुकानमालकांना तसेच छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संचारबंदी उठवल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी हिंसाचाराचे केंद्र राहिलेल्या भालदारपुरा या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागपूरची स्थिती नियंत्रणात असून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर संचार बंदी उठवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. पुढील काळात सोशल मीडियाच्या वापरावर पोलिसांची संपूर्ण नजर राहणार असल्याचं देखील पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी सांगितलं.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी नागपुरात राडा झाल्याचं देखील पाहायला मिळालं होत. त्यानंतर नागपूरमध्ये संचारबंदी झाल्याचं पाहायला मिळालं होत. त्यात आता नागपूरमधील संचारबंदी हटवली आहे. नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता नागपूरमधील संचारबंदी हटवली आहे. ही संचारबंदी हटवल्यानंतर नागपूर पोलिसांनी संबंधित परिसरात रूटमार्च काढल्याचं देखील समोर आलंय.