नागपूर: खाद्यपदार्थांवर लेबल लावण्याची ही सुरुवात आहे. सिगारेटप्रमाणे खाद्यपदार्थांवर लेबल लावणे गरजेचे आहे. साखर आणि चरबी आता नवीन तंबाखू बनले आहे. आपण काय खात आहोत, हे लोकांना माहीत असणे गरजेचे आहे, असे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. सिगारेटच्या पाकिटांवर भितीदायक चित्रे असते. सिगारेट ओढणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचा इशारा त्या पाकिटांवर दिलेला असतो. आता समोसे, जलेबीबाबत आरोग्यविषयक इशारा देणारे फलक लावण्यात येणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी समोसे, जलेबी खरेदी करता त्या ठिकाणी हे फलक लावले जातील. एम्सच्या आदेशावरून नागपूरच्या दुकानांमध्ये चेतावनी फलक लावले जाणार आहे.
सिगारेटप्रमाणेच समोसा आणि जलेबी खाणे साखर आणि तेल असणारे पदार्थ देखील धोकादायक आहे. साखर आणि तेल असणारे पदार्थ आरोग्यासाठी अपायकारक असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. यामुळे आरोग्य मंत्रालयाने एम्स नागपूरला तेल आणि साखर खाणे आरोग्यासाठी घातक असल्याचे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. या फलकांवर खाण्यात येणाऱ्या पदार्थांमध्ये साखर आणि चरबी किती आहे, त्याची माहिती असणार आहे.
आरोग्य मंत्रालयाने एम्स नागपूरला तेल आणि साखरेबाबत आदेश दिले आहेत. त्यावरून नागपूरच्या दुकानांमध्ये फलक लावले जाणार आहे. यामुळे नागपूरमध्ये लवकरच समोसा आणि जलेबीसारख्या खाद्यपदार्थांच्या जवळ आरोग्यविषयक चेतावनी फलक लावले जाणार आहे. लोकांना जागरूक करण्यासाठी हे फलक लावले जाणार आहेत.
हेही वाचा:पैठण तालुक्यातील मोंसबी उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त; मोसंबीचा भाव घसल्याने शेतकरी दुहेरी संकटात
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सर्व केंद्रीय संस्थांना खाद्यपदार्थांमध्ये तेल आणि साखर असणारे फलक लावण्याचे आदेश दिले आहे. या फलकांवर चकचकीत रंग असतील आणि दररोज खाल्या जाणाऱ्या स्नॅक्समध्ये किती चरबी आणि साखर असते, त्याची माहिती दिली जाणार आहे.
का सुरु केले अभियान?
एम्स नागपूरच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, केंद्राच्या मिळालेल्या आदेशानंतर सार्वजनिक ठिकाणी आणि कॅन्टीनमध्ये फलक लावण्याची तयारी केली जात आहे. हा उपक्रम मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यासारख्या असंसर्गजन्य आजारांविरुद्धच्या लढाईचा एक भाग आहे. हे अभियान थेट साखर आणि तेल जास्त असलेल्या आहाराशी जोडलेले आहे.