Wednesday, August 20, 2025 02:10:04 PM

कोल्हापुरात पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा

उदगाव, कोल्हापुरातील स्मशानभूमीत महिलांनी व पुरुषांनी नग्न अवस्थेत अघोरी पूजा केल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामपंचायत सतर्क झाली आहे.

कोल्हापुरात पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील उदगाव येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अघोरी पूजा व भानामतीचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले आहे. भरदिवसा महिला आणि पुरुष नग्न होऊन करणी आणि भानामतीचे प्रकार करत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

जयसिंगपूरमधील एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर उदगाव वैकुंठधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. रक्षा विसर्जनाच्या दिवशी नातेवाईक पुन्हा त्या ठिकाणी गेले असता त्यांनी राखेच्या बाजूला काळी बाहुली, नारळ आणि नाव असलेली चिठ्ठी आढळून आली. यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेज मागवले.

हेही वाचा: Today's Horoscope: तुमचं ग्रहमान काय सांगतं? जाणून घ्या आजचं राशीफल

फुटेजमध्ये महिलांकडून आणि पुरुषांकडून वेगवेगळ्या वेळी स्मशानभूमीत नग्न अवस्थेत अघोरी पूजा करण्यात येत असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अमावस्या, पौर्णिमा, शनिवार आणि बुधवार या दिवशी विशेषतः हे प्रकार होत असल्याचेही उघड झाले आहे. सदर प्रकारानंतर उदगाव ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.


सम्बन्धित सामग्री